MI vs RCB : मुंबईसमोर आरसीबीचं आव्हान, अशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग 11
MI vs RCB Playing XI : आयपीएलच्या मैदानात आज मुंबई आणि आरसीबी यांच्यात सामना होणार आहे. गुणतालिकेत तळाला असणाऱ्या दोन्ही संघातील लढत रोमांचक होईल.
![MI vs RCB : मुंबईसमोर आरसीबीचं आव्हान, अशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग 11 mumbai indians royal challengers bangalore mi vs rcb playing xi ipl 2024 latest sports news MI vs RCB : मुंबईसमोर आरसीबीचं आव्हान, अशी असेल दोन्ही संघाची प्लेईंग 11](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/11/b58f0f37d2624d3e414265038944e7bb1712814431440265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MI vs RCB Playing XI : आयपीएलच्या मैदानात आज मुंबई आणि आरसीबी यांच्यात सामना होणार आहे. गुणतालिकेत तळाला असणाऱ्या दोन्ही संघातील लढत रोमांचक होईल. भारतीय वेळेनुसार, सायंकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. पण दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी असेल? दोन्ही संघाला आज विजय गरजेचा आहे. मुंबई इंडियन्स चार सामन्यात दोन गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे, तर आरसीबी पाच सामन्यात दोन विजयासह नवव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. पाहूयात आजच्या सामन्यात दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी असेल ?
मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होणार का ?
तीन पराभवानंतर मुंबईच्या संघाला पहिला विजय मिळला. मागील सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केला होता. मुंबईच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता तशी कमीच आहे. मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा आणि ईशान किशन सलामीला उतरतील. सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड आणि हार्दिक पांड्या मध्यक्रम संभाळतील. रोमिरियो शेफर्ड आणि मोहम्मद नबी फिनिशिंग टच देतील. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहच्या जोडीला गेराल्ड कोइत्जे आणि पियूष चावला असतील.
आरसीबीविरोधात मुंबईची संभाव्य प्लेईंग 11 -
रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेविड, हार्दिक पांड्या, रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, गेराल्ड कोइत्जे, पीयूष चावला आणि जसप्रीत बुमराह
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होणार ?
लागोपाठ पराभवाचा सामना कऱणाऱ्या आरसीबीच्या ताफ्यात बदल होण्याची शक्तता आहे. कॅमरुन ग्रीन याच्या जागी इंग्लंडच्या विल जॅक्स याला संधी मिळू शकते. त्याशिवाय रीस टॉप्लेच्या जागी लॉकी फर्गुसन याला आज संधी मिळण्याची शक्यता आहे.
आरसीबीकडू फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली सलामीला उतरतील. त्यानंतर रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कार्तिक,अनुज रावत यांच्यावर मध्यक्रमची जबाबदारी असेल. नुकत्याच झालेल्या विश्वचषकात ग्लेन मॅक्सवेल यानं वानखेडे मैदानावर द्विशतक ठोकलं होतं. त्यामुळे आजच्या सामन्यात मॅक्सवेलच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
आरसीबीची संभाव्य प्लेइंग 11-
फाफ डु प्लेसिस, विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमरून ग्रीन/विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, अनुज रावत, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, मयंक डागर, रीस टॉपले/लॉकी फर्गुसन आणि मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)