IPL 2023 : मनिष पांडे बाहेर, रायडूची एन्ट्री; दिल्लीच्या संघातही बदल, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
CSK vs DC Playing 11 And Toss Update : चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
CSK vs DC Playing 11 And Toss Update : चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेपॉकच्या मैदानावर धोनीने पाहुण्या दिल्लीला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. चेन्नईच्या संघात मोठा बदल करण्यात आला आहे. धोनीने अंबाती रायडूला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. तर दिल्लीने अष्टपैलू ललीत यादव याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. दिल्लीने मनीष पांडेला प्लेईंग 11 मधून बाहेर बसवलेय. पाहूयात दोन्ही संघांची प्लेईंग 11
CSK Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, अंबाती रायडू, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.
DC Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स
डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, रिली रुसो, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.
CSK vs DC, IPL 2023 : कुणाचं पारड जड?
यंदाच्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नईला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, नंतर चेन्नईनं दमदार कमबॅक केलं आणि आता संघ प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचला आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला यंदाच्या हंगामात काही खास कामगिरी करता आलेली नाही. सुरुवातीपासूनच संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत चेन्नई संघ 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सने 11 पैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर चार सामने गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला. दिल्ली कॅपिट्ल्स दहाव्या स्थानावर आहे. दिल्ली संघाने त्यांच्या 10 पैकी चार सामन्यांत विजय मिळवला तर सहा सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. संघांकडे आठ गुण आहेत.
हेड टू हेड आकडेवारी -
इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) संघ एकूण 27 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारड जड आहे. चेन्नईने 17 सामने जिंकले आहेत, तर दिल्ली संघाला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत.
MA Chidambaram Stadium Pitch Report : चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम (MA Chidambaram Stadium) चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) म्हणूनही ओळखले जातं. हे खूप जुनं मैदान आहे. या मैदानावर (Pitch Report) फिरकीपटूंचं वर्चस्व आहे. अनेक फिरकीपटूंनी येथे गोलंदाजी करताना भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. ज्या संघात चांगले फिरकीपटू असतील तो संघ या मैदानावर वर्चस्व गाजवतो. खेळपट्टीवर चेंडू वळणाचे प्रमाण जास्त असू शकतं. गेल्या काही वर्षांत चेपॉक स्टेडिअमची खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगली ठरली आहे. खेळ जसजसा पुढे सरकतो तसतशी खेळपट्टी खूप कोरडी होते आणि याचा फिरकीपटूंना फायदा झाला होतो.