एक्स्प्लोर

MS Dhoni DRS : धोनी रिव्यू सिस्टीम, माहीच्या निर्णयानं पंचांवर निर्णय फिरवण्याची वेळ, मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

CSK vs LSG :डीआरएस म्हणजे डिसीजन रिव्यू सिस्टीम होय. भारतात त्याला धोनी रिव्यू सिस्टीम म्हटलं जातं. लखनौ विरुद्धच्या मॅचमध्ये देखील धोनीनं डीआरएस घेतल्यावर पंचांना निर्णय बदलावा लागला.

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)आणि लखनौ सुपर किंग्ज (Lucknow Supr Giants) यांच्यात आयपीएलमध्ये (IPL 2024) काल 39 वी लढत झाली. या मॅचमध्ये लखनौ सुपर जाएंटसनं चेन्नई सुपर किंग्जला पराभूत केलं आहे. एमएस धोनीची एक झलक पाहण्यासाठी मैदानावरील चाहते आतूर असतात. चेन्नई सुपर किंग्जचा विकेटकीपर असलेल्या महेंद्रसिंह धोनीला डिसीजन रिव्यू सिस्टीमचा मास्टर समजलं जातं. डीआरएसला देखील धोनी रिव्यू सिस्टीम म्हटलं जातं. कालच्या मॅचमध्ये धोनीनं घेतलेल्या एका डीआरएसनंतर पंचांना निर्णय बदलावा लागला. 

धोनीनं डीआरएस घेतला अन्...

तुषार देशपांडे चेन्नई सुपर किंग्जकडून 13 वी ओव्हर टाकत होता. 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर पंचांना तो बॉल वाईड असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाला चॅलेंज देत धोनीनं डीआरएस घेतला. डीआरएसच्या चॅलेंजनंतर रिप्ले पाहिल्यानंतर पंचांना त्यांचा निर्णय बदलावा लागला. यावेळी मार्कस स्टॉइनिस मैदानावर फलंदाजी करत होता. तुषारनं अखेरचा बॉल टाकताच पंचांनी लगोलग वाईड इशारा दिला होता. धोनीनं तातडीनं डीआरएस घेतला होता.

महेंद्रसिंह धोनीच्या इशाऱ्यानंतर ऋतुराज गायकवाडनं डीआरएस घेतला. यानंतर थर्ड अम्पायरनं मैदानावरील पंचांना निर्णय बदलण्यास सांगितलं. धोनीनं दिलेलं चॅलेंज, पंचांना बदलावा लागलेला निर्णय या सगळ्या गोष्टी मार्कस स्टोइनिस बघत राहिला. पंचांनी निर्णय बदलताच सोशल मीडियावर मीम्सचं वारं सुरु झालं आहे. 

चेन्नई सुपर किंग्जनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 4 बाद 210 धावा केल्या होत्या. चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडनं शतकी खेळी केली होती. ऋतुराज गायकवाडनं 108 धावा केल्या. त्याला शिवम दुबेनं 66 धावांची खेळी करत साथ दिली होती. दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या लखनौ सुपर जाएंटसची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र, मार्कस स्टोइनिसनं 124 धावांची खेळी करुन लखनौला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. यानंतर गुणतालिकेत लखनौ चौथ्या स्थानावर आहे तर चेन्नई पाचव्या स्थानावर आहे. चेन्नईचे साखळी स्पर्धेतील अद्याप सहा सामने शिल्लक आहेत. 

चेन्नईचा चौथा पराभव

चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये विजयानं सुरुवात केली होती. चेन्नईनं चेपॉकवरील पहिल्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं होतं. यानंतर चेन्नईसाठी आयपीएल समिंश्र राहिलेलं आहे. चेन्नईला लखनौ सुपर जाएंटसकडून दोनवेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. चेन्ननई सुपर किंग्जचं यंदाच्या आयपीएलमध्ये 8 मॅच खेळल्या त्यापैकी चार मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला तर त्यांना चार मॅचमध्ये विजय मिळाला. 

संबंधित बातम्या :

Video : कॅमेरामननं फॉलो केलं, लक्षात येताच महेंद्रसिंह धोनी भडकला, लगोलग कडक इशारा,पाहा व्हिडीओ

 IPL 2024, Orange Cap List :ऋतुराज गायकवाडच्या शतकानं रोहित शर्माला धक्का, विराट कोहलीचं टेन्शन वाढवलं, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मोठा उलटफेर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hording EXCUSIVE : होर्डिंगसाठी उभारण्यात आलेला पाया कमकुवत, फक्त 3 मीटरचीच पायाभरणीPm Modi Varanasi : वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गंगापूजन ,आज भरणार उमेदवारी अर्जABP Majha Headlines : 10  AM :14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNanded : नांदेडच्या छापेमारीत 8 किलो सोनं, 14 कोटींची रोकड जप्त : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
Premachi Goshta Serial Update : इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Embed widget