MS Dhoni : धोनीचा नादच खुळा! आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी फिनिशर, जवळपासही कुणीही नाही
IPL 2022 : धोनीने 15 व्या षटकांत आतापर्यंत 442 धावांचा पाऊस पाडलाय. 16 व्या षटकात धावगती आणखी वाढते.
IPL 2022 : आयपीएलचा रणसंग्राम 26 मार्चपासून सुरु होत आहे. यावेळी दोन नव्या संघाचा सहभाग झाल्यामुळे आयपीएलमधील एकूण संघाची संख्या दहा झाली आहे. त्यामुळे 74 सामने होणार आहेत. मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक आयपीएल चषक जिंकले आहेत. त्यानंतर सर्वाधिक चषक जिंकण्याचा मान धोनीच्या चेन्नई संघाकडे आहे. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई संघ पाचव्यांदा चषकावर नाव कोरण्यासाठी मैदानावर उतरेल.
गतविजेता चेन्नई संघ पुन्हा एकदा विजेतेपदासाठी मैदानात उतरेल. धोनीच्या नेतृत्वात हे शक्यही होऊ शकते. कारण, आकडेच तसे सांगतात. आयपीएलच्या इतिहासात धोनीसारखा फिनिशर आतापर्यंत झाला नाही. धोनी आयपीएलचा सर्वात यशस्वी फिनिशर आहे. अखेरच्या पाच षटकांत धोनी मैदानावर असेल तर धावांचा पाऊस पडल्याशिवाय राहत नाही. गोलंदाजांची पिटाई ठरलेलीच. 15 व्या षटकांपासूनच धोनी धावांचा पाऊस पाडतो. अखेरच्या पाच षटकांत सर्वाधिक धावा काढण्याचा मान धोनीच्या नावावर आहे. 15 व्या षटकांत धोनीने सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. धोनीने 15 व्या षटकांत आतापर्यंत 442 धावांचा पाऊस पाडलाय. 16 व्या षटकात धावगती आणखी वाढते. पाहूयात अखेरच्या पाच षटकांत कुणी किती धावा काढल्या आहेत..
16 व्या षटकांत कुणाच्या किती धावा -
महेंद्र सिंह धोनी - 476 धावा
एबी डिविलियर्स - 447 धावा
रोहित शर्मा - 336 धावा
कायरन पोलार्ड - 314 धावा
युवराज सिंह - 305 धावा
17 व्या षटकांत सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज -
महेंद्र सिंह धोनी - 572 धावा
कायरन पोलार्ड - 445 धावा
एबी डिविलियर्स - 386 घावा
रोहित शर्मा - 362 धावा
दिनेश कार्तिक - 360 धावा
18 व्या षटकांत सर्वाधिक धावा काढणारे फलंदाज -
महेंद्र सिंह धोनी - 596 धावा
कायरन पोलार्ड - 433 धावा
एबी डिविलियर्स - 406 धावा
रोहित शर्मा - 293 धावा
विराट कोहली - 276 धावा
19 व्या षटकांत सर्वाधिक धावा कुणी चोपल्या?
महेंद्र सिंह धोनी - 599 धावा
एबी डिविलियर्स - 404 धावा
कायरन पोलार्ड - 362 धावा
रवींद्र जडेजा - 305 धावा
हार्दिक पंड्या - 273 धावा
20 व्या षटकांत कोणत्या खेळाडूंनी पाडला धावांचा पाऊस?
महेंद्र सिंह धोनी - 610 धावा
कायरन पोलार्ड - 378 धावा
रवींद्र जडेजा - 276 धावा
रोहित शर्मा - 248 धावा
हार्दिक पंड्या - 233 धावा