IPL 2022 : एका डावात सर्वाधिक धावा खर्च करणारा गोलंदाज कोण?
एखाद्या गोलंदाजाचा दिवस खराब असेल तर नकोशा विक्रमाची नोंद होते. चार षटकांमध्ये धावांचा पाऊस पडतो.
Indian Premier League 2022 : आयपीएलमध्ये षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो. फलंदाजांच्या आक्रमकतेमुळे गोलंदाजांची पळती भुई थोडी होऊन जाते. एखाद्या गोलंदाजाचा दिवस खराब असेल तर नकोशा विक्रमाची नोंद होते. चार षटकांमध्ये धावांचा पाऊस पडतो. आज पाहूयात चार षटकात सर्वाधिक धावा कोणत्या गोलंदाजाने दिल्या आहेत.. यामध्ये टॉप पाच गोलंदाज कोण आहेत... कुणाच्या नावावर या नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
बासिल थंपी (Basil Thampi)
सनराइजर्स हैदराबादकडून खेळताना बासिल थंपीने आरसीबीविरोधात चार षटकात तब्बल 70 धावा खर्च केल्या होत्या. मिस्टर 360 एबी डिविलियर्स, मोईन अली आणि कॉलिन डी ग्रैंडहोम यांनी विस्फोटक फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला होता. बसिल थंपीला चार षटकात 70 धावा चोपल्या होत्या. या बळावर आरसीबीने 20 षटकात 218 धावांचा डोंगर उभा केला होता.
ईशांत शर्मा - (Ishant sharma)
2013 मध्ये ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. एका सामन्यात ईशांत शर्माने चार षटकात 66 धावा खर्च केल्या होत्या. चेन्नईच्या फलंदाजांनी गोलंदाजी फोडून काढली होती.
मुजीब उर रहमान
2019 मध्ये पंजाबच्या मुजीबच्या गोलंदाजीवर हैदराबादच्या फलंदाजांनी चार षटकात 66 धावांचा पाऊस पाडला होता. SRH च्या फलंदाजांनी 20 षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 212 धावांचा पाऊस पाडला. डेविड वॉर्नरने 56 चेंडूत 81 धावांचा पाऊस पाडला. हैदराबादने हा सामना 45 धावांनी जिंकला.
उमेश-संदीपलाही चोपले -
याशिवाय उमेश यादव आणि संदीप शर्माच्या गोलंदाजीवरही धावांचा पाऊस पडला. उमेश यादव आणि संदीप शर्माने चार षटकात प्रत्येकी 65 धावा खर्च केल्या आहेत.
हे देखील वाचा-