MI Vs SRH LIVE Score Updates, IPL 2024 : मुंबई इंडियन्स अन् सनरायजर्स हैदराबाद आमने सामने, विजयाचं खातं कोण उघडणार?
Mumbai Indians Vs Sun Risers Hyderabad LIVE Score Updates, IPL 2024 : आयपीएलमधील आठवी मॅच मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचा पहिल्या मॅचमध्ये पराभव झालेला.
LIVE
Background
Mumbai Indians Vs Sun Risers Hyderabad LIVE: आयपीएलमध्ये (IPL) मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांची सुरुवात सारखीच झाली आहे. मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स विरुद्ध 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तर, सनरायजर्स हैदराबादला कोलकाता विरुद्ध 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. या लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागलं आहे. दोन्ही संघांचं नेतृत्त्व नवे कप्तान करत आहेत. मुंबईचं नेतृत्त्व हार्दिक पांड्याकडे तर सन रायजर्स हैदराबादचं नेतृत्त्व पॅट कमिन्सकडे आहे.
मुंबईचा 31 धावांनी पराभव
मुंबईचा 31 धावांनी पराभव.. हैदराबादने दिलेल्या 278 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 246 धावांपर्यंत मजल मारली
मुंबईला पाचवा धक्का
हार्दिक पांड्याच्या रुपाने मुंबईला पाचवा धक्का बसला आहे. मुंबईला 2 षटकात 54 धावांची गरज
मुंबईला चौथा धक्का
पॅट कमिन्सने मुंबईला दिला चौथा धक्का... सेट झालेल्या तिलक वर्माला केले बाद.. तिलक वर्मा 64 धावांवर बाद
मुंबईला तिसरा धक्का
150 धावसंख्येवर मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का बसला आहे. नमन धीर 30 धावांवर बाद झाला आहे.
मुंबईची शानदार सुरुवात
278 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने जोरदार पलटवार दिला. मुंबईने 10 षटकांमध्ये 150 धावांपर्यंत मजल मारली आहे.