MI vs RR, IPL 2023 Live: यशस्वी जायस्वालची वादळी फलंदाजी, मुंबईला विजयासाठी 213 धावांचे आव्हान
MI vs RR Live Score: मुंबई आणि राजस्थानच्या संघात रंगतदार सामना होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसातील हा दुसरा सामाना होय.
LIVE
Background
IPL 2023, Match 42, MI vs RR: आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आज रविवारी डबल हेडर सामने रंगणार आहे. आज, 30 एप्रिल रोजी दुसरा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघामध्ये पाहायला मिळणार आहे. मुंबईच्या घरच्या मैदानावर आजचा सामना रंगणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएल गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स सध्या दुसऱ्या स्थानावर तर मुंबई नवव्या स्थानावर आहे.
IPL 2023, MI vs RR : मुंबई आणि राजस्थान आमने-सामने
आजचा सामना जिंकून (RR vs MI) दोन्ही संघ अधिक गुण मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये (IPL 2023 Points Table) उडी मारण्याचा प्रयत्न करतील. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) हा यंदाच्या मोसमातील आघाडीच्या संघांपैकी एक आहे. राजस्थान संघ यंदा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. राजस्थानने आतापर्यंत आठ पैकी पाच सामन्यांत विजय मिळवला आहेत. तर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने सात सामन्यांपैकी तीन सामने जिंकले आहेत.
MI vs RR Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 27 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई (Mumbai Indians) संघाचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतं. मुंबई संघाने आयपीएलमध्ये आतापर्यंत 14 सामने जिंकले आहेत. तर राजस्थान (Rajasthan Royals) संघाला 12 सामने जिंकण्यात यश मिळालं आणि एक सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघाची सरासरी धावसंख्या 200 आहे.
Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध राजस्थान सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही हीच धावसंख्या दिसून आली आहे. वानखेडेच्या सपाट मैदानावर गोलंदाजांना विकेट घेण्यात विशेष मदत मिळत नाही. येथे बाऊंड्री लाईन जवळ असल्याने फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतं.
MI vs RR, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आज, 30 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
मुंबईचा राजस्थानवर सहा विकेटने विजय
मुंबईचा राजस्थानवर सहा विकेटने विजय
मुंबईला चौथा धक्का, सूर्यकुमार यादव बाद
मुंबईला चौथा धक्का, सूर्यकुमार यादव बाद
मुंबईला तिसरा धक्का, कॅमरुन ग्रीन 44 धावांवर बाद
मुंबईला तिसरा धक्का, कॅमरुन ग्रीन 44 धावांवर बाद झाला आहे. रोहित शर्मा 3 आणि ईशान किशन 28 धावांवर बाद झाले आहेत
मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली, यशस्वीचे दमदार शतक, राजस्थानची 212 धावांपर्यंत मजल
यशस्वी जायस्वाल याच्या झंझावाती शतकाच्या बळावर राजस्थानने 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जायस्वाल याने 124 धावांची शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे शतक होय.. तर मुंबईविरोधात दुसरे शतक आहे. मुंबईला वानखेडेच्या मैदानावर विजयासाठी 213 धावांचे आव्हान आहे.
यशस्वी जायस्वालचा झंझावात -
पहिल्या चेंडूपासून यशस्वी जायस्वाल याने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. यशस्वी जायस्वाल याने दमदार शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे शतक होय. हॅरी ब्रूक आणि वेंकटेश अय्यर यांच्यानंतर यशस्वी जायस्वाल याने शतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, वेकंटेश अय्यर आणि यशस्वी जायस्वाल यांनी मुंबईविरोधात शतकी खेळी केली आहे. यशस्वी जायस्वाल याने आज मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली. यशस्वी जायस्वाल याने 62 चेंडूत 124 धावांची खेळी केली. या खेळीत जायस्वाल याने 8 खणखणीत षटकार लगावले. त्याशिवाय 16 चौकारही मारले आहेत. यशस्वी जायस्वाल याच्यानंतर राजस्थानकडून सर्वाधिक धावा अतिरिक्त आहेत.