Suryakumar Yadav : मैदानात सूर्याचं वादळ अवतरलं; षटकार... चौकारांचा पाऊस, मोडला स्वतःचाच विक्रम
MI vs RCB, IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने केवळ 35 चेंडूत 83 धावांची धडाकेबाज खेळी केली. सूर्याच्या खेळीच्या जोरावर मुंबईने 6 गडी राखून एकतर्फी विजय नोंदवला.
Suryakumar Yadav in IPL : आयपीएल 2023 (IPL 2023) मधील 54 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal Challengers Bangalore) सहा विकेट्सने पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) विजयाचा शिल्पकार ठरला. सूर्यकुमारच्या झंझावाती खेळीमुळे मुंबईनं बंगळुरुचा पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने स्वत:चाच विक्रम मोडला आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वाधिक 83 धावांची खेळी केली आहे.
मैदानात 'सूर्या'चं वादळ अवतरलं
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात मुंबईला 200 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. सूर्यकुमारच्या शानदार खेळीमुळे मुंबईनं 16.3 षटकांत आव्हानं पूर्ण करत सामना जिंकला. या सामन्यात सूर्यकुमारने केवळ 35 चेंडूत 83 धावांची धडाकेबाज खेळी केली. यासोबतच सूर्याने स्वत:चा जुना विक्रम मोडत नवीन विक्रम रचला आहे. सूर्यकुमारने आयपीएलमध्ये 83 धावांची खेळी करत सर्वाधिक 82 धावांचा विक्रम मोडला आहे.
Game recognizes game 🤝#SuryakumarYadav #MIvRCB #TATAIPL #IPLonJioCinema | @surya_14kumar pic.twitter.com/jdmtO9Ec2K
— JioCinema (@JioCinema) May 9, 2023
षटकार... चौकारांचा पाऊस, मोडला स्वतःचाच विक्रम
आयपीएलमध्ये सूर्यकुमार यादवने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या गाठली आहे. मुंबई इंडियन्सचा (MI) फलंदाज सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्धच्या सामन्यात 35 चेंडूंत 83 धावा ठोकल्या. सूर्यकुमारने आरसीबी विरुद्धच्या खेळीत सात चौकार आणि सहा षटकार ठोकले. सूर्याने त्याचा आयपीएलमधील आधीचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडला आहे. यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध होती.
सूर्यकुमारचा दमदार फॉर्म परतला
आयपीएलचा सोळावा हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी (MI) सर्वात मोठा चिंतेचा विषय होता सूर्यकुमार यादवचा फॉर्म. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या होम वनडे मालिकेत सूर्या सलग तीन सामन्यांत खातं न उघडताच तंबूत परतला होता. यानंतर या मोसमातील पहिल्या तीन सामन्यात सूर्याने फक्त 16 धावा केल्या. यानंतर आता मात्र, सूर्यकुमार पुन्हा एकदा दमदार फॉर्ममध्ये परतलेला दिसत आहे. त्याने मागील सहा सामन्यांमधील चौथी अर्धशतकी खेळी केली आहे.
Suryakumar Yadav in the last 6 innings:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 9, 2023
57 (26) Vs PBKS.
23 (12) Vs GT.
55 (29) Vs RR.
66 (31) Vs PBKS.
26 (22) Vs CSK.
83 (35) Vs RCB.
- 310 runs at an average of 51.66 and 200 Strike Rate! The return of Sky. pic.twitter.com/QEPn53MJw6
मुंबईकडून बंगळुरुचा सहा विकेट्सने पराभव
मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहा गडी राखून पराभव केला. या सामन्यात आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 199 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 16.3 षटकांत 4 गडी गमावून 200 धावा केल्या आणि सहा गडी राखून सामना जिंकला. आरसीबीकडून कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अर्धशतकी खेळी केली. दोघांनी शतकी भागीदारीही केली, पण त्यांची ही खेळी व्यर्थ ठरली. मुंबईकडून इशान किशनने 42 धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या 83 आणि नेहल वढेराच्या 52 धावांच्या खेळीने मुंबईला विजय मिळवून दिला. या सामन्यातील विजयासह मुंबईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर बंगळुरु संघ सातव्या स्थानावर घसरला आहे.