MI Vs PBKS LIVE Score Updates, IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज भिडणार, विजयाच्या ट्रॅकवर कोण परतणार?
Mumbai Indians Vs Punjab Kings LIVE Score Updates, IPL 2024 : आयपीएलमधील 33 वी मॅच पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.

Background
MI Vs PBKS LIVE Score Updates, IPL 2024 :आज आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलमधील 33 वी मॅच होत आहे. मुंबई आणि पंजाबच्या संघानं सहा पैकी दोन मॅचमध्ये विजय मिळवलेला आहे. गुणतालिकेत दोन्ही संघांचे गुण सारखेच असून नेट रनरेटच्या मुद्यावर पंजाब किंग्ज वरच्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आयपीएलमध्ये 250 वी मॅच खेळणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स कमबॅक करतं का ते पाहावं लागेल. तर, शिखर धवनच्या नेतृत्त्वात पंजाब किंग्जचा देखील विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल.
मुंबईचा 9 धावांनी विजय
मुंबईचा पंजाबवर 9 धावांनी विजय
पंजाबला नववा धक्का
हरप्रीत ब्रारच्या रुपाने पंजाबला नववा धक्का बसलाय.



















