![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
MI vs PBKS Playing 11 : मुंबई आणि पंजाब आमने-सामने, हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड? जाणून घ्या...
MI vs PBKS Playing 11 : आयपीएल 2023 च्या 30 व्या सामन्यात आज मुंबई (Mumbai Indians) आणि पंजाब (Punjab Kings) या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.
![MI vs PBKS Playing 11 : मुंबई आणि पंजाब आमने-सामने, हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड? जाणून घ्या... MI vs PBKS Playing 11 Mumbai Indians vs Punjab Kings ipl 2023 match 31 Wankhede Stadium Pitch Report 2023 ipl live marathi news MI vs PBKS Playing 11 : मुंबई आणि पंजाब आमने-सामने, हेड टू हेड आकडेवारीत कुणाचं पारड जड? जाणून घ्या...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/22/40576c6345b0e3c0174c5e09263cceac1682133037629322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
MI vs PBKS IPL 2023 Match 31 : आयपीएल (IPL 2023) आज, 22 एप्रिलला आज मुंबई (Mumbai Indians) आणि पंजाब (Punjab Kings) यांच्यात रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स संघ आमने-सामने येणार आहेत. मुंबई इंडियन्सने मागील सामन्यात हैदराबाद संघाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला. तसेच पंजाब किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभवानंतर आज मुंबई विरुद्ध मैदानात उतरणार आहे.
MI vs PBKS IPL 2023 : मुंबई आणि पंजाब आमने-सामने
आयपीएल 2023 मध्ये मुंबई संघाला विजयाचं खातं उघडायला थोडा वेळ लागला. यंदाच्या मोसमाच्या सुरुवातीच्य दोन सामन्यात पराभवानंतर मात्र मुंबईने विजयी हॅटट्रिक मारली. सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर आज मुंबई इंडियन्स पंजाब किंग्सविरोधात मैदानात उतरणार आहे. मुंबई पलटन आजच्या सामन्यात विजयी मोहिम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
पंजाब किंग्सने यंदाच्या आयपीएलची सुरुवात दोन विजयांसह केली पण त्यानंतर संघाला पराभव पत्करावा लागला. पंजाब संघाने सहा पैकी तीन सामने जिंकले असून गुणतालिकेत संघ सातव्या स्थानावर, तर मुंबई सहाव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्सला पराभव पत्करावा लागला आहे.
Wankhede Stadium Pitch Report : वानखेडे स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
आज मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर मुंबई विरुद्ध पंजाब सामना पाहायला मिळणार आहे. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या आठ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नऊ वेळा 180 हून अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे. यामध्ये चार वेळा 200 चा टप्पा ओलांडला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोच्च धावसंख्या 240/3 आहे. आयपीएलमध्येही असाच प्रकार घडला आहे. येथील सपाट विकेटवर गोलंदाजांना विशेष मदत मिळत नाही. येथील सीमा लहान आहेत आणि आऊटफिल्ड खूप वेगवान आहे.
MI vs PBKS Playing 11: दोन्ही संघांची प्लेईंग 11
MI Playing 11 : मुंबई प्लेईंग 11
रोहित शर्मा (कर्णधार), सुर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, तिलक वर्मा, हृतिक शोकीन, कॅमेरॉन ग्रीन, पीयूष चावला, नेहाल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, ईशान किशन (विकेटकीपर), जेसन बेहरेनडॉर्फ.
PBKS Playing 11 : पंजाब संभाव्य प्लेईंग 11
शाहरुख खान, हरप्रीत सिंग, सॅम करन (कर्णधार), अर्थव तायडे, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चहर, हरप्रीत ब्रार, नॅथन एलिस, अर्शदीप सिंह.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)