एक्स्प्लोर

IPL 2023 : कॅमरुन ग्रीनचे वादळ, हैदराबादविरोधात झळकावले शतक

Cameron Green, IPL 2023 : कॅमरुन ग्रीन याने नाबाद 100 धावांची खेळी केली.

Cameron Green, IPL 2023 : कॅमरुन ग्रीन याच्या वादळी शतकाच्या जोरावर मुंबईने हैदराबादचा आठ विकेटने पराभव केला. कॅमरुन ग्रीन याने नाबाद 100 धावांची खेळी केली. यंदाच्या हंगामातील हे आठवे आणि मुंबईचे दुसरे शतक होय.. कॅमरुन ग्रीन याचे आयपीएलमधील पहिले शतक होय. 

कॅमरुनचे वादळ - 

201 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. सलामी फलंदाज इशान किशन अवघ्या 14 धावांवर बाद झाला. भुवनेश्वर कुमार याने इशानचा डाव संपुष्टात आणला. कर्णधार रोहित शर्मा आणि कॅमरुन ग्रीन यांनी वादळी फलंदाजी केली. या जोडीने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला.  दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 128 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा याने 37 चेंडूत 56 धावांची खेळी केली. या खेळीत रोहित शर्मा याने आठ चौकार आणि एक षटकार लगावला. कर्णधार बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन याने डावाची सुत्रे हातात घेतली. कॅमरुन ग्रीन याने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेताल. ग्रीन याने 47 चेंडूत शतक झळकावले. या खेळीत त्याने आठ षटकार आणि आठ चौकार लगावले.  कॅमरुन ग्रीन याने नाबाद 100 धावांची खेळी केली. सूर्युकमार यादव याने नाबाद 25 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने चार चौकार लगावले. 

यंदाचे आठवे शतक -

मुंबईच्या अखेरच्या साखळी सामन्यात कॅमरुन ग्रीन याने वादळी शतकी खेळी केली. ग्रीन याने यंदाच्या हंगामातील आपले पहिले शतक झळकावले. याआधी यंदाच्या हंगामात इतर फलंदाजांनी सात शतके झळकावली आहेत. यामध्ये दोन विदेशी खेळाडूंचा समावेश आहे, दोन्ही खेळाडू हैदराबादचे आहेत. हॅरी ब्रूक आणि हेनरिक क्लासेन यांनी हैदराबादसाठी शतकी खेळी केली. त्यात आता कॅमरुन ग्रीन याची भर पडली आहे. वेंकटेश अय्यर, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली... या भारतीय खेळाडूंनी यंदा शतके झळकावली आहेत. एका हंगामात आठ शतके होण्याची पहिलीच वेळ आहे. 

मुंबई इंडियन्ससाठी सहावे शतक - 

आयपीएलच्या इतिहासात मुंबईसाठी हे सहावे शतक होय. याआधी सूर्यकुमार यादव, एस सिमन्स, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर आणि सनथ जयासर्या यांनी मुंबईसाठी शतक झळकावले आहे. यामध्ये चार शतके मुंबईत आलेली आहेत. तर एक मोहाली आणि एक कोलकाता येथे शतक आलेय. 

 मुंबई प्लेऑफमध्ये पोहचणार का ?
 
हैदराबादचा पराभव करत मुंबईने प्लेऑफच्या दिशेने आगेकूच केली आहे. आरसीबी आणि गुजरात यांच्यातील सामन्यावर मुंबईचे प्लेऑफचे गणित अवलंबून आहे. बेंगलोरमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु आहे. त्यामुळे नाणेफेकी उशीराने होणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाला तर मुंबई प्लेऑफमध्ये पोहचेल.  मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी गुजरातने सामना जिंकावा लागेल.. अथवा पावसाने हजेरी लावावी लागेल. 

महत्त्वाच्या बातम्या

उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Embed widget