न भूतो न भविष्य... पथिराणानं घेतला आयपीएलचा सर्वोत्तम झेल, धोनीही झाला अवाक VIDEO
Matheesha Pathirana : आयपीएल 2024 मधील सर्वोत्कृष्ट झेल दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामन्यावेळी पाहायला मिळाला.
IPL 2024 Best Catch, Matheesha Pathirana : आयपीएल 2024 मधील सर्वोत्कृष्ट झेल दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामन्यावेळी पाहायला मिळाला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी अतिशय आक्रमक सुरुवात केली. चेन्नईच्या प्रत्येक गोलंदाजांचा त्यांनी समाचार घेतला. सलामीची जोडी चेन्नईसाठी कर्दनकाळ ठरत होती, त्याचवेळी मथीशा पथिराणा यानं अफलातून झेल घेतला. पथिराणा याचा झेल पाहून धोनीही अवाक झाला. पथिराणा यानं डेविड वॉर्नर याचा झेल हवेत सूर मारत शानदार घेतला. डेविड वॉर्नरलाही या झेलवर विश्वास बसला नाही.
पथिराणा यानं घेतलेला झेल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुस्तफिजुर रहमानच्या (Mustafizur Rahman) चेंडूवर डेविड वॉर्नर यानं रिव्हर्स स्वीप मारला. चेंडू वेगाने सिमारेषाकडे जात होता, पण पथिराणा यानं हवेत झेपवत शानदार झेल घेतला. पथिराणा याने हवेत झेपवत एका हाताने अप्रतिम झेल घेतला. पथिराणा याने घेतलेल्या झेल पाहून धोनी आणि डेविड वॉर्नरही अवाक झाले. धोनीने पथीराणाचं कौतुक केले.
CATCH OF THE SEASON BY PATHIRANA....!!!! 🤯🦅 pic.twitter.com/jXVkcxJLQ2
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 31, 2024
दिल्लीच्या फलंदाजीवेळी दहावे षटक घेऊन मुस्तफिजुर आला होता. वॉर्नरचा चांगला जम बसला होता, मुस्तफिजुर यानं स्लोअर चेंडू टाकून फसवण्याचा प्रयत्न केला. पण वॉर्नरने रिव्हर्स स्वीप मारत मोठा फटका मारला. चौकार जाणार असेच सर्वांना वाटत होते. पण पथिराणा याने हवेत लांब झेप घेत झेल घेतला. पथिराणा यानं दिल्लीला पहिला धक्का दिला. डेविड वॉर्नर 35 चेंडूमध्ये 52 धावा काढून बाद झाला. या खेळीमध्ये त्याने तीन षटकार आणि पाच चौकार ठोकले.
MATHEESHA PATHIRANA!!!
— Kanishka Roshan (@KrosaniTy) March 31, 2024
CATCH OF THE TOURNAMENT!!
HAS TO BE!!!!! pic.twitter.com/4HiAOi2Z4f
FLYING MATHEESHA PATHIRANA...!!!! 🕊️ pic.twitter.com/8P1WGEwixy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 31, 2024
MS Dhoni's reaction on Matheesha Pathirana's catch. pic.twitter.com/3jG0UZfWdo
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 31, 2024
दिल्लीची 191 धावांपर्यंत मजल -
डेविड वॉर्नर आणि ऋषभ पंत यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर दिल्लीने निर्धारित 20 षटकांमध्ये 191 धावांपर्यंत मजल मारली. डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्लीला आक्रमक सुरुवात करुन दिली. त्यानंतर ऋषभ पंत याने वादळी अर्धशतक ठोकत धावसंख्या 191 पर्यंत पोहचवली. दिल्लीकडून थ्वी शॉ 43, वॉर्नर 52 आणि ऋषभ पंत याने 51 धावांची खेळी केली. चेन्नईकडून पथिराणा याने तीन विकेट घेतल्या.