LSG vs RCB, IPL 2023 Live: अमित मिश्रा बाद.. आरसीबीचा १८ धावांनी विजय
LSG vs RCB, IPL 2023 : आरसीबी पराभवाचा बदला काढणार का ?
LIVE
Background
LSG vs RCB, IPL 2023 : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. लखनौच्या घरच्या मैदानावर आजचा सामना रंगणार आहे. ईकाना स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएल गुणतालिकेत लखनौ संघ सध्या दुसऱ्या स्थानावर तर बंगळुरु सहाव्या स्थानावर आहे. यंदाच्य आयपीएलच्या सोळाव्या हंगाातील हा 43 वा सामना असेल. आयपीएल 2023 मधील 15 व्या सामन्यात बंगळुरुला लखनौ संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बंगळुरु संघ तयार झाला आहे.
LSG vs RCB, IPL 2023 : लखनौ आणि बंगळुरुमध्ये लढत
लखनौ संघाने मागील सामन्यात पंजाब किंग्सवर विजय मिळवला. तर दुसरीकडे बंगळुरु संघाला मागील सामन्यात कोलकाताकडून पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. तर लखनौ सुपर जायंट्स संघ विजयी मोहित कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. लखनौ संघाने आतापर्यंत आठ पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर आरसीबी संघाने आठपैकी चार सामने जिंकले आहेत.
LSG vs RCB Head to Head : हेड टू हेड आकडेवारी पाहा
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) या दोन संघांमध्ये आतापर्यंत तीन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये बंगळुरु (RCB) संघाचं पारड जड असल्याचं पाहायला मिळतं. आरसीबीने तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत तर लखनौ (LSG) संघाला एक सामना जिंकण्यात यश मिळालं. दोन्ही संघांची सरासरी सर्वाधिक धावसंख्या 200 आहे.
Ekana Stadium Lucknow Pitch Report : इकाना खेळपट्टी कशी आहे?
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियम (Ekana Stadium) ची खेळपट्टी टी20 च्या दृष्टीने येथील खूपच संतुलित आहे. खेळपट्टी फलंदाजीसोबतच गोलंदाजांसाठीही उपयुक्त आहे. येथे खेळल्या गेलेल्या एकूण सहा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने पाच वेळा विजय मिळवला आहे. अशा वेळी नाणेफेक जिंकणं महत्त्वाचं ठरू शकतं. तसेच, पहिल्यांदा फलंदाजी करताना सरासरी 151 धावा होतात. या खेळपट्टीवर फिरकीपटू वर्चस्व गाजवू शकतात.
RCB vs LSG IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात आज, 01 मे रोजी लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना लखनौमधील ईकाना स्टेडियमवर (Ekana Sports City Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. त्याआधी संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.
IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.
अमित मिश्रा बाद.. आरसीबीचा १८ धावांनी विजय
अमित मिश्रा बाद.. आरसीबीचा १८ धावांनी विजय
लखनौला नववा धक्का, नवीन उल हक बाद
लखनौला नववा धक्का, नवीन उल हक बाद
लखनौला आठवा धक्का, रवि बिश्नोई धावबाद
लखनौला आठवा धक्का, रवि बिश्नोई धावबाद
लखनौला सातवा धक्का, कृष्णप्पा गौतम बाद
लखनौला सातवा धक्का, कृष्णप्पा गौतम बाद झाला.. गौतम याने १३ चेंडूत २३ धावांचे योगदान दिलेय
लखनौल सहावा धक्का, स्टॉयनिस बाद
लखनौल सहावा धक्का, स्टॉयनिस बाद