LSG Vs PBKS LIVE Score Updates, IPL 2024 : लखनौ सुपर जाएंटसने मारली बाजी; पंजाब किंग्सचा केला पराभव
Lucknow Super Giants Vs Punjab Kings LIVE Score Updates, IPL 2024 : आयपीएलमधील अकरावी मॅच लखनौ सुपर जाएंटस आणि पंजाब किंग्ज यांच्यात झाला.
LIVE
Background
LSG Vs PBKS LIVE Score Updates, IPL 2024 : आज पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि लखनौला सुपर जाएंटस (Lucknow Super Giants) यांच्यात झालेल्या सामन्यात लखनौने बाजी मारली. लखनौने 21 धावांनी पंजाब किंग्सवर विजय मिळवला.
पंजाबचा 21 धावांनी पराभव
लखनौने घरच्या मैदानावर पंजाबचा 21 धावांनी पराभव केला. पंजाब संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 178 धावा केल्या.
Match 11. Lucknow Super Giants Won by 21 Run(s) https://t.co/HvctlP1bZb #TATAIPL #IPL2024 #LSGvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024
पंजाबला दुसरा धक्का, प्रभसिमरन बाद
पंजाब किंग्जची दुसरी विकेट पडली. प्रभसिमरन सिंग 7 चेंडूत 19 धावा करून बाद झाला. मयंक यादवने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पदार्पणाच्या सामन्यात मयंकची ही दुसरी विकेट होती. पंजाबने 13.3 षटकात 128 धावा केल्या आहेत.
Match 11. WICKET! Over: 13.3 Prabhsimran Singh 19(7) ct Naveen-Ul-Haq b Mayank Yadav, Punjab Kings 128/2 https://t.co/HvctlP1bZb #TATAIPL #IPL2024 #LSGvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024
पंजाबला विजयासाठी 79 धावांची गरज
पंजाब किंग्जने 13 षटकांत 1 गडी गमावून 121 धावा केल्या. शिखर धवन 44 चेंडूत 66 धावा करून खेळत आहे. पंजाबला आता विजयासाठी 42 चेंडूत 79 धावांची गरज आहे.
पंजाबला पहिला धक्का, बेयरस्ट्रो बाद
लखनौला मयंक यादवने पहिली विकेट मिळवून दिली. पदार्पणाच्याच सामन्यात त्याने विकेट घेतली. पंजाब किंग्जचा जॉनी बेयरस्ट्रो बाद 42 धावा करून बाद झाला. 29 चेंडूंचा सामना करताना त्याने 3 चौकार आणि 3 षटकार मारले.
पंजाब किंग्सच्या 10 षटकांत 98 धावा
पंजाब किंग्सने चांगली सुरुवात केली आहे. एकही विकेट न गमावता पंजाब किंग्सने 10 षटकांत 98 धावा केल्या आहेत. शिखर धवनने अर्धशतक पूर्ण केले असून त्याला बेयरस्ट्रोची देखील चांगली साथ मिळते आहे.
𝐋𝐞𝐭 𝐡𝐢𝐦 𝐜𝐨𝐨𝐤! 👨🏻🍳#SaddaPunjab #PunjabKings #JazbaHaiPunjabi #TATAIPL2024 #LSGvPBKS pic.twitter.com/c1xLx2YMq7
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) March 30, 2024