KKR vs DC : केकेआरची विजयाची हॅट्रिक, दिल्लीचा आणखी एक पराभव, गुणतालिकेत मोठा उलटफेर
KKR vs DC : कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सला 106 धावांनी पराभूत करत विजय मिळवला. या विजयासह केकेआर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
![KKR vs DC : केकेआरची विजयाची हॅट्रिक, दिल्लीचा आणखी एक पराभव, गुणतालिकेत मोठा उलटफेर kkr vs dc kolkata knight riders beat delhi capitals and get top position in points table KKR vs DC : केकेआरची विजयाची हॅट्रिक, दिल्लीचा आणखी एक पराभव, गुणतालिकेत मोठा उलटफेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/04/41b7e643b274b498f8773621fc9bce381712169162791989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
विशाखापट्टणम : कोलकाता नाईट रायडर्सनं (IPL 2024 ) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals ) चा 106 धावांनी पराभव केला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वातील कोलकाताच्या टीमनं सलग तिसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी 7 बाद 272 धावा केल्या होत्या. तर, दिल्ली कॅपिटल्सनं 272 धावांचा पाठलाग करताना 166 धावा केल्या. केकेआरनं दिल्ली कॅपिटल्सच्या टीमवर 106 धावांनी विजय मिळवत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सनं गुणतालिकेत टॉपवर
केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील लढतीपूर्वी गुणतालिकेत पहिल्या स्थानावर तीन सामन्यांमधील विजयासह राजस्थान रॉयल्सचा संघ होता. राजस्थाननं देखील तीन मॅचमध्ये 6 विजयांसह पहिलं स्थान आपल्याकडे मिळवलं होतं. तर, केकेआरनं दिल्ली कॅपिटल्सला 106 धावांनी पराभूत करत 6 गुण मिळवले आहेत. केकेआरचं नेट रनरेट 2.52 इतकं आहे. तर, राजस्थान रॉयल्सचं नेट रनरेट 1.25 इतकं असल्यान ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर अनुक्रमे तिसऱ्या स्थानी चेन्नई सुपर किंग्ज तर चौथ्या स्थानी लखनऊ सुपर जाएंटस आहेत.
केकेआरनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेटवर 277 धावा केल्या होत्या. त्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 17.2 ओव्हरमध्ये 166 धावांवर बाद झाला. दिल्लीकडून रिषभ पंतनं 55 आणि स्टब्सनं 54 धावा केल्या. या दोघांशिवाय दिल्लीचे इतर खेळाडू मोठी धावसंख्या उभारु शकले नाहीत. डेविड वॉर्नरनं 18 आणि पृथ्वी शॉनं 10 धावा केल्या. अक्षर पटेल, अभिषेक पोरेल आणि मिशेल मार्श शुन्यावर बाद झाले.
केकेआरसाठी सुनील नरेननं सर्वाधिक 85 धावा केल्या. सुनील नरेनला रघुवंशीनं 54 धावा करुन साथ दिली. सुनील नरेन आणि रघुवंशी बाद झाल्यावर आंद्रे रसेल आणि रिंकू सिंगनं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर केकेआरनं 7 बाद 272 धावा केल्या.
मराठमोळा खेळाडू श्रेयस अय्यर याच्या नेतृत्त्वातील कोलकाता नाईट रायडर्सनं आज सलग तिसऱ्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे. आजच्या मॅचच्या निकालानंतर गुणतालिकेत मोठे उलटफेर झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या स्थानावर आहे. संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर तर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वातील सीएसके तिसऱ्या स्थानी तर के.एल. राहुलची एलएसजी चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे हार्दिक पांडयाच्या नेतृत्त्वातील मुंबई इंडियन्स शेवटच्या स्थानावर आहे.
संबंधित बातम्या :
DC vs KKR : श्रेयसनं टॉस जिंकला, कोलकाताचा पहिल्यांदा बॅटिंगचा निर्णय, विजयाची मालिका सुरु ठेवणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)