KKR vs DC: कुलदीपचा भेदक मारा, नितीश राणाचे संयमी अर्धशतक, कोलकात्याची 146 पर्यंत मजल
IPL 2022, KKR vs DC: नितीश राणाचे अर्धशतक आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या 42 धावांच्या बळावर कोलकात्याने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 146 धावा केल्या.

IPL 2022, KKR vs DC: दिल्लीच्या गोलंदाजीपुढे कोलकात्याची फलंदाजांनी नांग्या टाकल्या. नितीश राणाचे अर्धशतक आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या 42 धावांच्या बळावर कोलकात्याने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 146 धावा केल्या. दिल्लीला विजयासाठी 147 धावांची गरज आहे.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिलल्लीच्या गोलंदाजांपुढे कोलकात्याची फलंदाजी ढेपाळली. दिल्लीच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरत कोलकात्याची तारांबळ उडवली. फिंच (3), वेंकटेश अय्यर (6), बाबा इंद्रजीत (6) आणि सुनिल नारायण (0) स्वस्तात माघारी परतले. एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. 35 धावांत कोलकात्याने चार गडी गमावले होते. पण एका बाजूला कर्णधार श्रेयस अय्यर संयमी फलंदाजी करत होता. अय्यरने 42 धावांची संयमी फलंदाजी केली. अय्यरने नितीश राणासोबत मोलाची भागिदारी केली. अय्यर 42 धावांवर बाद झाला. अय्यरनंतर रसेलही शून्य धावसंख्येवर बाद झाला. कोलकात्याचा डाव लवकर संपुष्टात येईल असे वाटत असताना नितीश राणाने खिंड लडवली. राणाने 57 धावांची खेळी केली. रिंकू सिंह यानेही 23 धावांची छोटेखानी खेळी केली.
दिल्लीकडून कुलदीप यादवने भेदक मारा केला. कुलदीपने कोलकात्याच्या चार महत्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडले. कुलदीपने 4 षटकांत 14 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट घेतल्या. अक्षर पटेललाही एक विकेट मिळाली. मुस्तफिजुर रेहमान यानेही चार षटकांत 18 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेतल्या. चेतन सकारियाला एक विकेट मिळाली.
कोलकातामध्ये तीन बदल -
श्रेयस अय्यरने अंतिम 11 मध्ये तीन बदल केले आहेत. विकेटकिपर फलंदाज बाबा इंद्रजीतला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय एरॉन फिंचचे पुनरागमन झालेय. त्याशिवाय दिल्लीच्या ह्रषित राणालाही संधी देण्यात आली आहे. कोलकात्याने फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला वगळले आहे. कोलकात्याने शिवम मावी आणि सॅम बिलिंग्सला आराम दिलाय.
दिल्लीच्या संघात दोन बदल -
कोरोनातून सावरल्यानंतर दिल्लीच्या संघात मिचेल मार्शचं पुनरागमन झालेय. त्याशिवाय खलील अहमदच्या जागी चेतन साकरियाला संधी देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
