KKR vs LSG IPL 2025 : अबब.. 45 चौकार, 25 षटकार आणि 472 धावा! शेवटच्या षटकांत पंतच्या संघाचा चमत्कार, घरच्या मैदानावर KKRच्या पदरी पराभव
आयपीएल 2025 च्या आणखी एका रोमांचक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी पराभव केला.

KKR vs LSG IPL 2025 : आयपीएल 2025 च्या आणखी एका रोमांचक सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने शेवटच्या षटकात कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी पराभव केला. ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात साडेचारशेहून अधिक धावा झाल्या. प्रथम फलंदाजी करताना लखनौने निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर 238 धावांचा मोठा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात, केवळ 14 षटकांत 166 धावा करून विजयाकडे वाटचाल करत असलेला कोलकाता शेवटच्या षटकांत ट्रॅकवरून बाहेर पडला आणि 20 षटकांत फक्त 234 धावाच करू शकला. या सामन्यात एकूण रोमांचक 45 चौकार, 25 षटकार पाहायला मिळाले आणि 472 धावा झाल्या.
Thorough entertainment at the Eden Gardens 🏟 🍿
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2025
And it's the Rishabh Pant-led @LucknowIPL that prevail in a thrilling run fest 🥳
They bag 2️⃣ crucial points with a 4️⃣-run victory over #KKR 👏
Scorecard ▶ https://t.co/3bQPKnxnJs#TATAIPL | #KKRvLSG pic.twitter.com/31clVQk1dD
मार्श आणि पूरन नावाचं वादळ
कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण मार्श आणि पूरन यांच्या शानदार फलंदाजीमुळे लखनौला मोठी धावसंख्या उभारता आली. त्याआधी एडेन मार्कराम आणि मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी हर्षित राणाने मार्करामला आऊट करून मोडली. मार्कराम अर्धशतक झळकावण्याच्या जवळ होता पण तो तीन धावांनी हुकला. कारण 47 धावा केल्या. यानंतर, मार्शने आपली तुफानी कामगिरी सुरू ठेवली आणि अर्धशतक झळकावले. मार्शने 48 चेंडूत 81 धावा केल्या.
Mishti doi for the team tonight 💙 pic.twitter.com/LnUzcG8Vy1
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 8, 2025
मार्श बाद झाल्यानंतर, पूरनने आक्रमक फलंदाजी केली आणि फक्त 21 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पूरन शेवटपर्यंत राहिला पण त्याचे शतक पूर्ण करू शकला नाही. पूरनने 36 चेंडूत सात चौकार आणि आठ षटकारांसह 87 धावा काढत नाबाद राहिला. ज्यामुळे लखनौने 20 षटकांत तीन गडी गमावून 238 धावा केल्या. लखनौकडून अब्दुल समदने सहा धावा केल्या, तर डेव्हिड मिलरने चार धावा करून नाबाद राहिला. केकेआरकडून हर्षित राणाने दोन, तर आंद्रे रसेलने एक विकेट घेतली.
अजिंक्य रहाणे नडला पण...
कोलकाताने आपला डाव सुरू केला, पण क्विंटन डी कॉकच्या रूपात त्यांना पहिला धक्का बसला, जो 15 धावांवर आकाश दीपचा शिकार झाला. तोपर्यंत कोलकाताचा स्कोअर 37 धावा होता. यानंतर, सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणे यांनी वेगवान गतीने धावा काढणे सुरूच ठेवले. कोलकाता संघाने 6 षटकांत90 धावा केल्या. सुनील नरेन 13 चेंडूत 30 धावांची खेळी खेळून आऊट झाला.
Apne idol ka hi chalaan kaat diya 😌😂 pic.twitter.com/HuoxZJj1DX
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) April 8, 2025
नरेन बाद झाल्यानंतर, वेंकटेश अय्यर आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी जबाबदारी सांभाळली. यादरम्यान, शार्दुलने 13 व्या षटकात 5 वाईड बॉल टाकले, पण त्याच षटकात त्याने रहाणेला 61 धावांवर बाद केले आणि दोघांमधील 71 धावांची भागीदारी संपुष्टात आणली. पण रहाणे बाद होताच केकेआरच्या विकेट सारख्या पडत राहिल्या. रमणदीप, अंगक्रिश आणि रसेल खूपच स्वस्तात बाद झाले. 45 धावा करून वेंकटेश आऊट झाला. रिंकू सिंगला फलंदाजीसाठी आणले तोपर्यंत सामना संपला होता. रिंकू आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि 15 चेंडूत 38 धावा करून नाबाद राहिला. हर्षित राणाने 9 चेंडूत 11 धावा केल्या.





















