IPL 2022 : जेव्हा जॉन्टी ऱ्होड्स क्रिकेटच्या देवाच्या पाया पडतो
IPL 2022 : भारताचा महान क्रिकेटरपटू सचिन तेंडुलकर हा 2013 साली निवृत्त झाला. पण त्याची क्रेझ अद्याप कायम आहे. क्रिकेटमधील अनन्यसाधारण योगदानामुळे सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जातं.
IPL 2022 : भारताचा महान क्रिकेटरपटू सचिन तेंडुलकर हा 2013 साली निवृत्त झाला. पण त्याची क्रेझ अद्याप कायम आहे. क्रिकेटमधील अनन्यसाधारण योगदानामुळे सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जातं. सचिन आजही अनेक क्रिकेटपटूंचा आदर्श आहे. सचिनला जागतिक क्रिकेटमध्ये मोठा मान मिळतो. आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्या सामन्यानंतर याची प्रचिती पुन्हा एकदा पाहायला मिळली. क्षेत्ररक्षणातील बाप माणूस म्हणून ओळखला जाणाऱ्या जॉन्टी ऱ्होड्सने सचिन तेंडुलकरचे आशिर्वाद घेण्याचा प्रयत्न केला.
पंजाब किंग्सचा फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्स सचिन तेंडुलकरच्या पाया पडत असतानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात पंजाबबरोबर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर मुंबईच्या खेळाडूंना भेटण्यासाठी मेंटॉर सचिन तेंडुलकर मैदानावर अवतरला होता. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स याने सचिन तेंडुलकरचे आशिर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
सामन्यानंतर मुंबईचा मेंटॉर सचिन तेंडुलकर आणि पंजाबचा फिल्डिंग कोच जॉन्टी ऱ्होड्स यांची भेट झाली. या भेटीवेळी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी ऱ्होड्स याने सचिन तेंडुलकर याचे पाया पडून आशिर्वाद घेण्याचा प्रयत्न केला. सचिन तेंडुलकर याने जॉन्टी ऱ्होड्स याला असं करण्यास मनाई केली. पण हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जॉन्टी ऱ्होड्सला क्षेत्ररक्षणातील बाप माणूस म्हणून ओळखलं जातं. जॉन्टी ऱ्होड्ससारखा क्षेत्ररक्षक अद्याप झालेला नाही.
Jonty Rhodes yesterday tried to touch Sachin Tendulkar's feet after the match. pic.twitter.com/X8UjjWtfPD
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 14, 2022
मुंबईची निराशाजनक कामगिरी -
आयपीएलच्या 15 व्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. मुंबईला पहिल्या पाचही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर आहे. पण आयपीएल प्लेऑफच्या स्पर्धेतून अद्याप बाहेर गेलेला नाही. मुंबईला आणखीही संधी आहे. याआधीही मुंबईने पुनरागमन करण्याचा करिश्मा केला आहे. आयआधी मुंबईने लागोपाठ पाच पराभवानंतर प्लेऑफमध्ये जागा मिळवली होती.
आयपीएल 15 मधील मुंबईची कामगिरी -
पहिला सामना - दिल्लीकडून चार विकेटने पराभव
दुसरा सामना - राजस्थान रॉयल्सचा 23 धावांनी विजय
तिसरा सामना - कोलकात्याचा पाच विकेटने विजय
चौथा सामना - आरसीबीचा सात गड्यांनी विजय
पाचवा सामना - पंजाबचा 12 धावांनी विजय