एक्स्प्लोर

रियान परागने कोहलीकडून पर्पल कॅप हिसकावली, ऑरेंज कॅपवर युजवेंद्र चहलचाही दावा

Orange Cap Ipl 2024 : रियान पराग यानं विराट कोहलीला मागे टाकले आहे. यंदाच्या हंगामातील ऑरेंज कॅप रियान पराग याच्याकडे गेली आहे.

Orange Cap Ipl 2024 : युजवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यानंतर रियान पराग याच्या झंझावती अर्धशतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला वानखेडेवर सहा विकेटने पराभूत केले. रियान पराग यानं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. रियान पराग यानं नाबाद 54 धावांचं योगदान दिले. या खेळीच्या बळावर रियान पराग यानं विराट कोहलीला मागे टाकले आहे. यंदाच्या हंगामातील ऑरेंज कॅप रियान पराग याच्याकडे गेली आहे. रियान पराग आणि विराट कोहली यांनी तीन सामन्यात प्रत्येकी 181 धावा केल्या आहेत. पण रियान पराग दोन वेळा नाबाद राहिला आहे, त्याशिवाय त्याचा स्ट्राईक रेट आणि सरासरीही विराट कोहलीपेक्षा जास्त सरस आहे. त्यामुळे रियान पराग पहिल्या क्रमांकावर आहे. 

ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण मंगळवारी विराट कोहली पुन्हा ऑरेंज कॅपवर कब्जा मिळवण्याची शक्यता आहे. मंगळावीर आरसीबी आणि लखनौ यांच्यात सामना रंगणार आहे. ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत हेनरिक क्लासेन आणि शिखर धवन यांचाही क्रमांक लागतो. हेनरिक क्लासेन तिसऱ्या तर धवन चौथ्या क्रमांकावर आहे. डेविड वॉर्नर पाचव्या स्थानावर आहे. पाहूयात कोण कोणत्या क्रमांकावर आहे... 

क्रमांक खेळाडू सामने डाव नाबाद  धावा सर्वोच्च धावसंख्या सरासरी स्ट्राईक रेट शतक अर्धशतक चौकार षटकार
1
 
रियान पराग Riyan Parag
 
3 3 2 181 84* 181.00 160.17 0 2 13 12
2
विराट कोहली, Virat Kohli
RCB
3 3 1 181 83* 90.50 141.40 0 2 15 7
3
हेनरिक क्लासेन Heinrich Klaasen
SRH
3 3 1 167 80* 83.50 219.73 0 2 5 17
4
शिखर धवन, Shikhar Dhawan
PBKS
3 3 0 137 70 45.67 133.00 0 1 16 4
5
डेविड वॉर्नर David Warner
DC
3 3 0 130 52 43.33 144.44 0 1 13 8
6
साई सुदर्शन Sai Sudharsan
GT
3 3 0 127 45 42.33 119.81 0 0 10 2
7
अभिषेक शर्मा, Abhishek Sharma
SRH
3 3 0 124 63 41.33 200.00 0 1 9 11
8
तिलक वर्मा, Tilak Varma
MI
3 3 0 121 64 40.33 147.56 0 1 3 9
9
संजू सॅमसन, Sanju Samson
RR
3 3 1 109 82* 54.50 143.42 0 1 9 6
10
निकोलस पूरन, Nicholas Pooran
LSG
2 2 1 106 64* 106.00 170.96 0 1 7 7
11
शिवम दुबे, Shivam Dube
CSK
3 3 1 103 51 51.50 151.47 0 1 7 6

पर्पल कॅप कुणाकडे ?

चेन्नईच्या मुस्तफिजुर रहमान यानं पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. रहमान यानं तीन सामन्यात सात विकेट घेतल्या आहेत. तर युजवेंद्र चहल याने सहा विकेट घेत दुसरं स्थान पटकावलं आहे. मोहित शर्मा याच्या नावावरही सहा विकेट आहेत. खलील अहमद, ट्रेंट बोल्ट, हर्षित राणा, नांद्रे बर्गर यांच्या नावार प्रत्येकी पाच पाच विकेट आहेत. 

मुंबईचा संघ तळाशी - 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही विजय नोंदवता आला नाही. तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. गुणतालिकेत मुंबईचा संघ दहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. मुंबई हा एकमेव असा संघ आहे, ज्याला अद्याप एकही विजय नोंदवता आला नाही. तर दुसरीकडे कोलकाता आणि राजस्थान संघाला अद्याप एकाही पराभवाचा सामना करावा लागला नाही.  राजस्थानचा संघ गुणातलिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget