(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 : 55 सामने संपले, पण कोणताच संघ प्लेऑफमध्ये नाही, पाहा कुणाजवळ किती संधी?
IPL 2024 Playoffs : आयपीएल 2024 स्पर्धा अंतिम टप्प्याकडे पोहचली आहे. आयपीएलमधील 10 संघांनी आपापले 10 सामने खेळले आहेत.
IPL 2024 Playoffs : आयपीएल 2024 स्पर्धा अंतिम टप्प्याकडे पोहचली आहे. आयपीएलमधील 10 संघांनी आपापले 10 सामने खेळले आहेत. सध्या प्लेऑफची स्पर्धा अधिक रोचक झाली आहे. 55 सामन्यानंतरही प्लेऑफमध्ये दाखल झालेला एकही संघ मिळाला नाही. त्याशिवाय अधिकृत एकाही संघाचं आव्हान संपुष्टात आलेले नाही. गुणतालिकात पाहिल्यास कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांचं प्लेऑफचं स्थान निश्चित मानले जातेय. तर मुंबई इंडियन्सचं आव्हान संपल्यात जमा असल्याचं दिसतेय. पण अधिकृत अद्याप एकाही संघाचा प्लेऑफमध्ये प्रवेश झालेला नाही. स्पर्धेतील 55 सामने झाले आहेत, अद्याप 15 सामने शिल्लक आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या नावावर प्रत्येकी 16 -16 गुण आहेत. गुणतालिकेत तळाला असणाऱ्या गुजरातच्या नावावर आठ गुण आहेत. 55 सामन्यानंतरही प्लेऑफच समीकरण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाहूयात कोणत्या संघाकडे किती संधी आहे.
कोणत्या संघाकडे जास्त संधी -
कोलकाता नाईट रायडर्स 16 गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. कोलकात्याचे अद्याप तीन सामने शिल्लक आहेत. त्याशिवाय राजस्थान रॉयल्सचेही 16 गुण आहेत. त्यांचे चार सामने अद्याप शिल्लक आहेत. त्यामुळे कोलकाता आणि राजस्थान हे संघ गुणातालिकेत अखेरपर्यंत पहिल्या दोन मध्येच राहतील असा अंदाज आहे. या दोन्ही संघाचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित मानले जातेय. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर 12 गुण आहेत. चेन्नईचे अद्याप 3 सामने शिल्लक आहेत. चेन्नईने उर्वरित सर्व सामने जिंकल्यास प्लेऑफमध्ये स्थान निश्चित मानले जातेय. चेन्नई 14 गुणांसहही प्लेऑफमध्ये दाखल होऊ शकतं, पण इतरांच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून राहावा लागणार आहे. चेन्नईप्रमाणेच हैदराबाद संघाचीही स्थिती आहे. हैदराबादचेही 12 गुण आहेत. पण चेन्नईचा रनरेट चांगला असल्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
जर-तरच्या फेरीत फसले संघ -
लखनौ सुपर जांयट्सच्या नावावरही 12 गुण आहेत, त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत. क्वालिफाय करण्यासाठी त्यांनाही उर्वरित सर्व सामन्यात विजय अनिवार्य आहे. कारण, लखनौचा रनरेट खूपच खराब आहे. लखनौनं उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवला तर 16 गुणांसह प्लेऑफमध्ये दाखल होती. दिल्ली कॅपिटल्सही जर तर च्या फेऱ्यात अडकला आहे. दिल्लीलाही प्लेऑफमध्ये दाखल होण्यासाठी उर्वरित सामने मोठ्या फराकाने जिंकावे लागणार आहेत.
4 संघावर टांगती तलवार -
मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टातच आले आहे. पण त्याशिवाय आरसीबी, पंजाब आणि गुजरात यांचेही आव्हान खडतर झाले आहे. आरसीबी, गुजरात आणि पंजाब यांच्या नावावर 8 गुण आहेत. या संघाचे प्रत्येकी तीन तीन सामने शिल्लक आहेत. उर्वरित सामने जिंकल्यास संधी आहे. पण इतर संघाच्या कामगिरीवर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.