(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयपीएल सुरु असतानाच या कर्णधारांनी दिला होता राजीनामा
IPL captaincy : आयपीएल सुरु असताना अर्ध्यातूनच कर्णधारपद अनेकांनी सोडलं आहे. काही खेळाडूंकडून कर्णधारपद काढून घेतले तर काहींनी स्वत:हून कर्णधारपद सोडले.
Rohit Sharma captaincy : आयपीएलमधील सर्वात यशस्वी असणाऱ्या मुंबई इंडियन्सचं यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबईला लागोपाठ आठ पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्सच्या पराभवाचं खापर रोहित शर्मावर फोडलं जात आहे. चहाच्या टपरीपासून ते रेल्वे अन् सोशल मीडिायवर चाहते फक्त रोहित शर्माला पराभवाला जबाबदार धरत आहेत. रोहित शर्माची खराब नेतृत्व, फलंदाजीवर आरोप लावण्यात येत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने यंदा खराब कामगिरी केली आहे. आतापर्यंत रोहितला एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर रोहित शर्मा कर्णधारपद सोडणार का? अशी चर्चा सुरु झाली.
आयपीएल सुरु असताना अर्ध्यातूनच कर्णधारपद अनेकांनी सोडलं आहे. काही खेळाडूंकडून कर्णधारपद काढून घेतले तर काहींनी स्वत:हून कर्णधारपद सोडले. आयपीएल सुरु असतानाच याआधी काही कर्णधारांना राजीनामा द्यावा लागला होता... पाहूयात या खेळाडूंची यादी...
2009 मध्ये केविन पीटरसनला आरसीबीचं कर्णधारपद सोडावं लागले होते. त्यानंतर अनिल कुंबळेकडे कर्णधारपद देण्यात आले होते. कुंबळेनं आरसीबीला फायनलपर्यंत नेहलं होतं.
2012 मध्ये कुमार संगकाराला डेक्कन चार्जर्सचं कर्णधारपद गेले होते. कॅमरन व्हाइटला कर्णधार करण्यात आले होते.
2012 मध्ये डॅनिअल विटोरीला आरसीबीचं कर्णधारपद सोडावं लागले होते. त्यानंतर विराट कोहलीकडे कर्णधारपद देण्यात आले होते.
2013 मध्ये रिकी पाँटिंगकडून मुंबईने कर्णधारपद काढून घेतले होते. रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यानंतर मुंबईने पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरले होते.
2013 मध्येच एडम गिलख्रिस्टकडून पंजाबने कर्णधारपद काढून घेतले होते.
2018 मध्ये दिल्लीने दोन वेळच्या आयपीएल विजेत्या गौतम गंभीरकडून कर्णधारपद काढून घेतले होते. श्रेयस अय्यरला कर्णधारपद सोपवण्यात आले होते.
2019 मध्ये राजस्थान रॉयल्सने अजिंक्य रहाणेकडून कर्णधारपद काढून घेतले होते.
2020 मध्ये दिनेश कार्तिककडून कोलकात्याने कर्णधारपद काढून घेतले होते.
2021 मध्ये हैदराबादने डेविड वॉर्नरकडून हैदराबादने कर्णधारपद काढून घेतले होते.