Rahul Dravid Head Coach Rajasthan Royals : 'घर वापसी', IPL 2025 मध्ये राहुल द्रविडची धमाकेदार एन्ट्री, 'या' संघाचा कारभार घेतला हातात
Rahul Dravid IPL 2025 : टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद आपल्या कोचिंगमध्ये जिंकून देणारा राहुल द्रविड पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे.
IPL 2025 RR Head Coach Rahul Dravid : टीम इंडियाला टी-20 वर्ल्ड कप 2024 चे विजेतेपद आपल्या कोचिंगमध्ये जिंकून देणारा राहुल द्रविड पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून त्यांचा कार्यकाळ वर्ल्ड कपनंतर संपला. तेव्हापासून तो आयपीएलच्या कोणत्याही संघात सामील होऊ शकतो अशी अटकळ बांधली जात होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी राहुल द्रविड पूर्णपणे तयार दिसत आहे.
राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक
राहुल द्रविडबद्दल बातमी आहे की, तो राजस्थान रॉयल्समध्ये परतला आहे. एका रिपोर्टनुसार, द्रविडला आयपीएल 2025 पूर्वी टीमचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. द्रविडने राजस्थान रॉयल्ससोबत करार केला आहे. द्रविडचे या संघाशी जुने नाते आहे. आयपीएल कारकिर्दीत तो राजस्थानचा कर्णधार होता. यानंतर तो संघाचा मार्गदर्शकही बनला.
RAHUL DRAVID TO RAJASTHAN ROYALS...!!!
— Johns. (@CricCrazyJohns) September 4, 2024
- Dravid is set to be the new Head Coach of Rajasthan Royals in IPL. [Espn Cricinfo] pic.twitter.com/VFjYzUVNvE
क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, राजस्थानने द्रविडची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी राजस्थानशी करार केला आहे. मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर द्रविड मेगा लिलावादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याचे संघाशी खूप चांगले संबंध आहेत.
Rahul Dravid is set to return to Rajasthan Royals ahead of the 2025 IPL season
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) September 4, 2024
Full story: https://t.co/cwqMp9GAsw pic.twitter.com/135nLBmVgP
द्रविडची आयपीएल कारकीर्द चमकदार राहिली आहे. आयपीएल 2012 आणि 2013 मध्ये तो राजस्थान रॉयल्सचा कर्णधार होता. यानंतरही तो आणखी दोन वर्षे संघाशी जोडला गेला. द्रविड 2014 आणि 2015 मध्ये संघाचा मार्गदर्शक आणि संचालक होता. त्यानंतर 2016 मध्ये तो दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये सामील झाला. यानंतर द्रविडने भारतीय क्रिकेट संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकला
द्रविड आयपीएल संघांनंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये गेला होता. 2019 मध्ये तो अकादमीचा प्रमुख झाला. यानंतर 2021 मध्ये त्यांना टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले. द्रविडच्या कोचिंगमध्ये भारताने 2024 चा टी-20 वर्ल्ड कप पण जिंकला आहे.
विक्रम राठोड यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी
कुमार संगकारा राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक आहे. आता द्रविडही संघाचा एक भाग आहे. त्यांच्यासोबत विक्रम राठोड यांनाही महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. राठोड यांना सहाय्यक प्रशिक्षक करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार त्यांनी करारावर स्वाक्षरीही केली आहे.