IPL 2025 Point Table : मुंबई इंडियन्सचं दणक्यात कमबॅक, हैदराबादवर दणदणीत विजय, गुणतालिकेत मोठा उलटफेर, तिसऱ्या स्थानी झेप, टॉपवर कोण?
IPL 2025 : मुंबई इंडियन्सनं सनरायजर्स हैदराबादला पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. आता मुंबईचा पुढचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे.

हैदराबाद : मुंबई इंडियन्सनं सुरुवातीला ट्रेंट बोल्ट च्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादला हादरे दिले. यानंतर रोहित शर्माच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर मुंबईनं हैदराबादला 7 विकेटनं पराभूत केलं आहे. मुंबई इंडियन्सचा हा सलग चौथा विजय ठरला. मुंबईनं यंदाच्या आयपीएलमध्ये 5 विजय मिळवले आहेत. या विजयाच्या जोरावर 10 गुणांसह नेट रनरेटच्या आधारे मुंबई इंडियन्सनं गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
आयपीएल गुणतालिका (IPL Point Table)
| अ.क्र. | संघ | मॅच | विजय | टाय | पराभव | गुण | नेट रनरेट |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 1. | गुजरात टायटन्स | 8 | 6 | 0 | 2 | 12 | 1.104 |
| 2. | दिल्ली कॅपिटल्स | 8 | 6 | 0 | 2 | 12 | 0.657 |
| 3. | मुंबई इंडियन्स | 9 | 5 | 0 | 4 | 10 | 0.673 |
| 4. | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | 8 | 5 | 0 | 3 | 10 | 0.472 |
| 5. | पंजाब किंग्ज | 8 | 5 | 0 | 3 | 10 | 0.177 |
| 6. | लखनौ सुपर जायंटस | 8 | 5 | 0 | 3 | 10 | 0.088 |
| 7. | कोलकाता नाईट रायडर्स | 8 | 3 | 0 | 5 | 6 | 0.212 |
| 8. | राजस्थान रॉयल्स | 8 | 2 | 0 | 6 | 4 | -0.633 |
| 9. | सनरायजर्स हैदराबाद | 8 | 2 | 0 | 6 | 4 | -1.361 |
| 10. | चेन्नई सुपर किंग्ज | 8 | 2 | 0 | 6 | 4 | -1.392 |
मुंबई इंडियन्सला विजयासाठी 144 धावांची गरज होती. मुंबई इंडियन्सची सुरुवात चागंली झाली नाही. रियान रिकल्टन 11 धावा करुन बाद झाला. यानंतर रोहित शर्मानं विल जॅक्सनच्या साथीनं मुंबईची वाटचाल विजयाच्या दिशेनं कायम ठेवली. मुंबई इंडियन्सनं पॉवरप्लेमध्ये 56 धावा केल्या. रोहित शर्मानं 35 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रोहित शर्मानं 9 वर्षानंतर आयपीएलच्या हंगामात सलग दोन अर्धशतकं केली.
रोहित शर्मानं 46 बॉलमध्ये 70 धावा केल्या. रोहितनं 8 चौकार आणि 3 षटकार मारले. सूर्यकुमार यादवनं 19 बॉलमध्ये 40 धावा केल्या. सूर्यानं 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तर, विल जॅक्सनं 19 बॉलमध्ये 22 धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्स आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी असून संघाचं नेट रनरेट देखील सुधारलं आहे.
आयपीएलचा गतवर्षीचा हंगाम ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या जोडीनं गाजवला होता. या वर्षी सनरायजर्स हैदराबादच्या सलामीवीरांना तो सूर गवसलेला दिसत नाही. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा फेल ठरले. ट्रेविस हेड आज खातं देखील खोलू शकला नाही.तर, अभिषेक शर्मा 8 धावा करुन बाद झाला. इशान किशन 1 रन करुन बाद झाला. नितीश कुमार रेड्डी 2 धावा करुन बाद झाला.हेनरिक क्लासेन यानं 71 तर मनोहर यानं 43 धावा केल्या. अनिकेत वर्मानं 12 धावा केल्या. हैदराबादचे इतर खेळाडू दोन आकडी संख्या देखील पार करु शकले नाहीत.
इतर बातम्या





















