IPL Auction 2025 : 204 जागेसाठी जगभरातून 1574 खेळाडूंनी नोंदवली नावं, 24-25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये पडणार पैशांचा पाऊस
IPL 2025 Mega Auction Update : 31 ऑक्टोबर रोजी सर्व 10 आयपीएल फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली...
IPL 2025 Mega Auction Players List : इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा हंगामा म्हणजेच आयपीएल 2025 चाहत्यांसाठी खूप वेगळा असणार आहे, कारण अनेक मोठे खेळाडू दुसऱ्या संघांचा भाग असतील. 31 ऑक्टोबर रोजी सर्व 10 आयपीएल फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली, त्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मेगा लिलावाच्या तारखाही जाहीर केल्या आहेत, ज्यामध्ये ते 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियामध्ये जेद्दाह शहरात आयोजित होणार आहे. यावेळी एकूण 1574 खेळाडूंनी आयपीएल मेगा लिलावासाठी आपली नावे नोंदवली असून त्यापैकी 1165 भारतीय खेळाडू आहेत.
आयपीएलने अधिकृतपणे जाहीर केलेल्या माहितीमध्ये मेगा प्लेयर ऑक्शनसाठी 48 भारतीय खेळाडू आहेत, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे, ज्यामध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. याशिवाय 152 भारतीय खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही पण आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय 965 भारतीय अनकॅप्ड खेळाडू आहेत ज्यांनी अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण केलेले नाही. अशा परिस्थितीत मेगा लिलावात सहभागी होण्यासाठी एकूण 1165 भारतीय खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. यापैकी ही यादी आता सर्व फ्रँचायझींकडे सोपवली जाईल, त्यानंतर मेगा लिलावापूर्वी अंतिम यादी जाहीर केली जाईल, ज्यामध्ये किती खेळाडूंवर बोली लावली जाईल याचा निर्णय घेतला जाईल.
409 परदेशी खेळाडूंपैकी 272 कॅप्ड खेळाडूंचा समावेश
यावेळी 16 विविध देशांतील 409 खेळाडूंनी आयपीएल मेगा लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नावे नोंदवली आहेत, त्यापैकी 272 खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. याशिवाय, असे फक्त 3 खेळाडू आहेत जे गेल्या आयपीएलचा भाग होते, परंतु त्यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही सामना खेळलेला नाही. यामध्ये 104 अनकॅप्ड परदेशी खेळाडूंचा समावेश आहे, जे आधी आयपीएलचा भाग नव्हते किंवा त्यांनी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले नाही.
✍️ 1574 Player Registrations
— IndianPremierLeague (@IPL) November 5, 2024
🧢 320 capped players, 1,224 uncapped players, & 30 players from Associate Nations
🎰 204 slots up for grabs
🗓️ 24th & 25th November 2024
📍 Jeddah, Saudi Arabia
Read all the details for the upcoming #TATAIPL Mega Auction 🔽🤩
कॅप्ड भारतीय - 48 खेळाडू
कॅप्ड आंतरराष्ट्रीय - 272 खेळाडू
गेल्या आयपीएल हंगामाचा भाग असलेले अनकॅप्ड भारतीय – 152 खेळाडू
अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू जे मागील IPL हंगामाचा भाग होते - 3 खेळाडू
अनकॅप्ड भारतीय - 965 खेळाडू
अनकॅप्ड इंटरनॅशनल - 104 खेळाडू
कोणत्या देशाचे किती खेळाडू
- अफगाणिस्तान 29
- ऑस्ट्रेलिया 76
- बांगलादेश 13
- कॅनडा 4
- इंग्लंड 52
- आयर्लंड 9
- इटली 1
- नेदरलँड 12
- न्यूझीलंड 39
- स्कॉटलंड 2
- दक्षिण आफ्रिका 91
- श्रीलंका 29
- युएई 1
- अमेरिका 10
- वेस्ट इंडिज 33
- झिम्बाब्वे 8
आम्ही तुम्हाला सांगतो की प्रत्येक फ्रँचायझी जास्तीत जास्त 25 खेळाडूंची निवड करू शकते. IPL 2025 मेगा लिलावात एकूण 204 स्लॉट भरले जातील.