एक्स्प्लोर

Hardik Pandya: Mumbai Indians: हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सला जेतेपद पटकावून देणार?; जाणून घ्या, संघाची जमेची बाजू!

Latest Marathi News: IPL 2024: रोहित शर्मा आणि इशान किशन संघासाठी सलामीला येऊ शकतात. रोहित आणि इशानचा अनुभव मुंबईसाठी खूप उपयोगी ठरू शकतो.

Latest Marathi News: IPL 2024: आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 5 वेळा चॅम्पियन बनले आहेत. मात्र गेल्या 3 हंगामात मुंबईचा संघ जादू दाखवू शकलेला नाही. मुंबईने शेवटचे जेतेपद 2020 साली पटकावले होते. आयपीएल 2023मध्ये, रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली, संघ प्लेऑफमध्ये पोहोचला, परंतु एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध (Gujarat Titans) पराभवाचा सामना करावा लागला. 

यंदाच्या म्हणजेच आयपीएल 2024च्या हंगामात मुंबईच्या संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करणार आहे. हार्दिकने 2022 मध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व करत गुजरातला जेतेपद मिळवून दिले होते. आता मुंबईच्या संघाला देखील हार्दिक पांड्या सहावी ट्रॉफी जिंकवून देणार का?, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.  

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना तगडा अनुभव-

विशेषतः फलंदाजीच्या बाबतीत मुंबई इंडियन्स खूप मजबूत दिसत आहेत. रोहित शर्मा आणि इशान किशन संघासाठी सलामीला येऊ शकतात. रोहित आणि इशानचा अनुभव मुंबईसाठी खूप उपयोगी ठरू शकतो. तिलक वर्माने गेल्या दोन हंगामात 300 हून अधिक धावा करून खूप अनुभव मिळवला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त, संघाकडे सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड आणि हार्दिक पंड्या यांच्या रूपात आंतरराष्ट्रीय स्तरावरील मजबूत फलंदाज आहेत. गेल्या हंगामाबद्दल बोलायचे झाल्यास मुंबईने अनेकवेळा 200 हून अधिक धावांचा पाठलाग केला होता.

जसप्रीत बुमराह आणि युवा गोलंदाजांचे मिश्रण

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आयपीएल 2023 मध्ये एकही सामना खेळू शकला नाही, परंतु यावेळी त्याचे पुनरागमन मुंबई इंडियन्स संघाला बळ देणार आहे. मुंबईला पुन्हा एकदा त्याच्या अचूक यॉर्कर्सची आणि डेथ ओव्हर्समध्ये उत्कृष्ट गोलंदाजीची गरज भासेल. संघाकडे पियुष चावलाच्या रूपाने अनुभवी फिरकी गोलंदाज असून जेसन बेहरेनडॉर्फची ​​अचूक गोलंदाजी विरोधी संघांना पुन्हा एकदा घाम फोडू शकते. बेहरेनडॉर्फने आयपीएल 2023 मध्ये 12 सामने खेळताना 14 विकेट घेतल्या. यावेळी, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज गेराल्ड कोएत्जी आणि वेस्ट इंडिजचा रोमॅरियो शेफर्ड हे देखील संघाशी जोडले गेले आहेत, ज्यांनी गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

आयपीएलमध्ये रोहित यशस्वी कर्णधार

आता आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार आहे. यावेळी रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार नाही. त्याच्या जागी व्यवस्थापनाने हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवले आहे. रोहित हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. रोहितने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावण्यात यश मिळवले होते.

संबंधित बातम्या:

CSK vs RCB सामन्यासाठी तिकिटांची किंमत किती, खरेदी कसं कराल?

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गौतम अदानी बारामतीत, अजित पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास, रोहित पवार झाले ड्रायव्हर
गौतम अदानी बारामतीत, अजित पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास, रोहित पवार झाले ड्रायव्हर
KDMC Election 2026: शिवसेना 65, भाजप 57; कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
शिवसेना 65, भाजप 57; कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
Nashik Election 2026: नाशिकमध्ये भाजपविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी, आजच युतीची घोषणा होणार?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी, आजच युतीची घोषणा होणार?
Ajit Pawar in Baramati: कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?

व्हिडीओ

Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
England Vs Australia 'बॉक्सिंग डे टेस्ट' मध्ये इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर मात Special Report
Yogi Adityanath Special Report योगी सरकारमध्ये ठाकूर Vs ब्राम्हण सुप्त संघर्ष, ब्राम्हण आमदार नाराज
Ekvira Temple : एकवीरा आईच्या दागिन्यांवर कुणाचा डल्ला? Special Report
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गौतम अदानी बारामतीत, अजित पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास, रोहित पवार झाले ड्रायव्हर
गौतम अदानी बारामतीत, अजित पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास, रोहित पवार झाले ड्रायव्हर
KDMC Election 2026: शिवसेना 65, भाजप 57; कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
शिवसेना 65, भाजप 57; कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
Nashik Election 2026: नाशिकमध्ये भाजपविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी, आजच युतीची घोषणा होणार?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार? मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी, आजच युतीची घोषणा होणार?
Ajit Pawar in Baramati: कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
कडाक्याच्या थंडीत पहाटे अजित पवारांचा बारामतीत पाहणी दौरा, हॉटेलवाल्याने चहाचा आग्रह करताच दादांनी काय केलं?
IND Squad vs NZ ODI Series : टी-20 मधून हकालपट्टी, आता वनडे मालिकेतून स्टार खेळाडूला डच्चू?, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCI उचलणार कडक पाऊल
टी-20 मधून हकालपट्टी, आता वनडे मालिकेतून स्टार खेळाडूला डच्चू?, न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी BCCI उचलणार कडक पाऊल
Beed crime: बीडमध्ये गुंडाराज, टोळक्याने बंदुकीच्या मुठीने व्यापाऱ्याचं डोकं फोडलं, नेकनूरमध्ये दोन गटात हाणामारी
बीडमध्ये गुंडाराज, टोळक्याने बंदुकीच्या मुठीने व्यापाऱ्याचं डोकं फोडलं, नेकनूरमध्ये दोन गटात हाणामारी
Maharashtra Weather Update: उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
उत्तरेतून थंड वाऱ्यांचे प्रवाह! महाराष्ट्रात वर्षाअखेर हाडं गोठवणारी थंडी; तापमान आणखी घसरणार; हवामान खात्याचा अंदाज काय?
Maharashtra Live: गौतम अदानी बारामतीत, अजित पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास
गौतम अदानी बारामतीत, अजित पवारांसोबत एकाच गाडीतून प्रवास
Embed widget