IPL 2024 SRH vs RR: आज सनरायझर्स हैदराबाद अन् राजस्थान रॉयल्सचा रंगणार सामना

IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: सध्या राजस्थानचा संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे, तर हैदराबादचा संघ पाचव्या स्थानावर आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 02 May 2024 11:24 PM
रोमांचक सामन्यात हैदराबादचा विजय

रोमांचक सामन्यात हैदराबादचा विजय... भुवनेश्वर कुमारची शानदार गोलंदाजी अखेरच्या चेंडूवर घेतली विकेट

राजस्थानला सहावा धक्का

एकापाठोपाठ एक राजस्थानला दोन धक्के. हेटमायरनंतर ध्रुव जुरेलही बाद

सामना रोमांचक

राजस्थानला 14 चेंडूत 21 धावांची गरज

राजस्थानचा अर्धा संघ तंबूत

हेटमायर मोक्याच्या क्षणी बाद.. राजस्थानला पाचवा धक्का

संजू सॅमसन गोल्डन डक

संजू सॅमसन शून्यावर बाद... राजस्थानला दुसरा धक्का

राजस्थानला पहिला धक्का

जोस बटलर इम्पॅक्ट पाडण्यात अशस्वी... भुवनेश्वर कुमारने सातव्यांदा केली बटलरची शिकार.. राजस्थानची खराब सुरुवात..  राजस्थान एक बाद एक धाव

राजस्थानसमोर 202 धावांचे आव्हान

हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 3 विकेटच्या मोबदल्यात 201 धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून नितीश रेड्डी यानं नाबाद 76 धावा केल्या. हेड यानं 58 तर क्लासेनने 42 धावा केल्या.

हैदराबाद 164/3

17 षटकानंतर सनरायजर्स हैदराबादनं तीन विकेटच्या मोबद्लायत 164 धावा केल्या आहेत.   नितीश रेड्डी 63 आणि क्लासेन 16 धावांवर खेळत आहेत.

हैदराबादला तिसरा धक्का

आवेश खानने ट्रेविस हेडची दांडी गुल केली. हेड 44 चेंडूत 58 धावा काढून बाद झालाय.

हैदराबादचं शतक फलकावर

13 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हैदराबादनं शतक फलकावर लावलेय. रेड्डी आणि हेडची फटकेबाजी

ट्रेविस हेडचं शानदार अर्धशतक

ट्रेविस हेडचं शानदार अर्धशतक.. हैदराबाद दोन बाद 92 धावा

हैदराबादला दुसरा धक्का

अनमोलप्रीत सिंह याच्या रुपाने हैदराबादला दुसरा धक्का बसला आहे. संदीप शर्मा यानं अनमोलप्रतीला स्वस्तात तंबूत धाडलं. त्यानं पाच धावा केल्या. हैदराबाद दोन बाद 35 धावा

हैदराबादला पहिला धक्का

अभिषेक शर्मा 12 धावा काढून बाद.. हैदराबादला पहिला धक्का बसलाय

राजस्थानचं ट्विट

हैदराबादचं ट्विट

खेळपट्टी कशी असेल?

राजस्थान आणि हैदराबादचा सामना राजीव गांधी मैदानावर होणार आहे. या मैदानात मोठ्या धावसंख्या उभारताना आपण पाहिलेली आहे. या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानकडून चहल आणि आर. अश्विन आणि हैदराबादकडून शाहबाद अहमदची गोलंदाजी महत्वाची ठरेल. 

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य Playing XI:

अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, एडम मारक्रम, हेनरिच क्लासेन, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनादकट, टी. नटराजन

राजस्थान संघाची संभाव्य Playing XI:

यशस्वी जैस्वाल, जॉस बटलर, संजू सॅमसन, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

पर्पल कॅपमध्ये शर्यतीत कोण?

सध्या मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 14 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा मुस्तफिजुर रहमान आणि पंजाब किंग्जचा हर्षल पटेल 14-14 विकेट्ससह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गायकवाडने कोहलीला मागे टाकले-

चेन्नई सुपर किंग्सने कर्णधार ऋतुराज गायकवाडने पंजाब किंग्जविरुद्ध 48 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 62 धावांची खेळी केली, ज्याच्या मदतीने त्याने ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गायकवाडने कोहलीला मागे टाकले. गायकवाडने 509 धावा पूर्ण केल्या आहेत. कोहली या यादीत 500 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

प्ले ऑफच्या फेरीसाठी वाढली चुरस, कोण ठरणार सरस?

राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ:

यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (W/C), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, टॉम कोहलर-कॅडमोर, शुभम दुबे, तनुष कोटियन, नवदीप सैनी, केशव महाराज, नांद्रे बर्गर, कुलदीप सेन, डोनोवन फरेरा, आबिद मुश्ताक, कुणाल सिंग राठौर

सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ:

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (W), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, मयंक मार्कंडे, राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग 

पार्श्वभूमी

IPL 2024 Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: आज सनरायझर्स हैदराबाद (SRH) अन् राजस्थान रॉयल्सचा (RR) सामना होणार आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी मैदानावर हा सामना रंगेल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. सध्या राजस्थानचा संघ गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे, तर हैदराबादचा संघ पाचव्या स्थानावर आहे.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.