एक्स्प्लोर

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: संजू सॅमसनमुळे राजस्थान रॉयल्सचं वाढलं टेन्शन; हैदराबादविरुद्धच्या लढतीआधी मोठी अपडेट आली समोर

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. पंरतु क्वालिफायरच 2 च्या लढतीआधी राजस्थान संघासाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.

IPL 2024 SRH vs RR Qualifier 2: आज राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात क्वालिफायर 2 चा सामना रंगणार आहे. चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर हा सामना रंगेल. या लढतीत हैदराबादच्या ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माची राजस्थानच्या रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहल या फिरकी जोडीसमोर कस लागणार आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. 

राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे. पंरतु क्वालिफायरच 2 च्या लढतीआधी राजस्थान संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध झालेल्या एलिमिनेटरच्या झालेल्या सामन्यानंतर तो पूर्णपणे संजू सॅमसनने तंदुरुस्त नसल्याचे सांगितले होते. संजू सॅमसनची तब्येत ठीक नव्हती, मात्र तरीही तो बंगळुरुविरुद्धचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. त्यामुळे संजू सॅमसनही तब्येत अजूनही ठीक नसल्यास राजस्थानसाठी हा मोठा धक्का असू शकतो. 

चेन्नईची खेळपट्टी कशी असेल ?

हैदराबाद आणि राजस्थान यांच्यातील दुसरा क्वालिफायर सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी आहे, या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊसही पडतो. चेन्नईच्या मैदानावर आतापर्यंत सर्वाधिक 200 धावांचा स्कोर झालाय.  सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स दोन्ही संघाचे फलंदाज फॉर्मात आहेत. दुसऱ्या क्वालिफायर-2 सामन्यात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.   

राजस्थान विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड-

सनरायइजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलमध्ये काटें की टक्कर झाली आहे. आयपीएलमध्ये हे दोन्ही संघ आतापर्यंत 19 वेळा भिडले आहेत. सर्व सामने रंगतदार झाले आहेत. सनरायजर्स हैदरादाबने 10 वेळा विजय मिळवलाय, तर राजस्थानला नऊ सामन्यात विजय मिळाला आहे. यंदाच्या हंगामात राजस्थान आणि हैदराबाद यांच्यामध्ये फक्त एकवेळा सामना झालाय. ज्यामध्ये हैदराबादने विजय मिळवलाय. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 201 धावांचा पाऊस पाडला होता. धावांचा पाठलाग करताना राजस्थानने 200 धावांपर्यत मजल मारली होती. हैदराबादने फक्त एका धावेनं सामना जिंकला होता. आता हिशोब चुकता करण्यासाठी राजस्थानचा संघ मैदानात उतरलाय. 

राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ:

यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (w/c), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, शिमरोन हेटमायर, नंद्रे बर्गर, शुभम दुबे, तनुष कोटियन, डोनोवन फरेरा, नवदीप सैनी, केशव महाराज, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक, कुणाल सिंग राठौर

सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ:

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (w), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (c), भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत, टी नटराजन, सनवीर सिंग, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, जयदेव उनाडकट, मयंक अग्रवाल, एडन मार्कराम, अनमोलप्रीत सिंग, उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, झटावेध सुब्रमण्यन, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget