IPL 2024 RR vs RCB Eliminator: आज राजस्थान रॉयल्स अन् रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात एलिमिनेटरचा रंगणार सामना

IPL 2024 RR vs RCB Eliminator: राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात जो संघ विजयी होईल, तो क्वालिफायरच 2 चा सामना कोलकाता नाइट रायडर्ससोबत खेळेल. 

मुकेश चव्हाण Last Updated: 22 May 2024 11:24 PM
राजस्थानचा विजय

राजस्थानचा विजय, आरसीबीचं आव्हान संपले

सहावा धक्का

राजस्थानला सहावा धक्का.. हेटमायर 26 धावांवर बाद.. राजस्थानला 12 चेंडूत 13 धावांची गरज

राजस्थानला पाचवा धक्का

रियान परागला बाद करत सिराजने राजस्थानला पाचवा धक्का दिला. मोक्याच्या क्षणी पराग बाद झाला. सिराजने काढला त्रिफाळा... राजस्थानला विजयासाठी 16 चेंडूत 16 धावांची गरज

राजस्थानला चौथा धक्का

ध्रृव जुरेलच्या रुपाने राजस्थानला चौथा धक्का बसलाय. विराट कोहलीचा अचूक थ्रो...  


 


राजस्थानला विजयासाठी 39 चेंडूत 60 धावांची गरज

राजस्थानला तिसरा झटका

कर्णधार संजू सॅमसन 17 धावा काढून बाद झाला. राजस्थानला लागोपाठ दुसरा धक्का...  कर्ण शर्माला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण दिनेश कार्तिकने यष्टीचीत करत राजस्थानला दिला धक्का... राजस्थान तीन बाद 86 धावा

राजस्तानला दुसरा धक्का

यशस्वी जायस्वाल 45 धावांवर बाद झाला. राजस्थानला दुसरा धक्का बसला. यशस्वी 30 चेंडूत 45 धावा काढून बाद झाला. राजस्थान दोन बाद 81 धावा

राजस्थानची वादळी सुरुवात

173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सने वादळी सुरुवात केली. केडमेर 15 चेंडूत 20 धावा काढून बाद झाला. यशस्वी जायस्वाल 45 तर संजू 15 धावांवर खेळत आहे. राजस्थान एक बाद 81 धावा

आरीसीबीची 172 धावांपर्यंत मजल

आरीसीबीची 172 धावांपर्यंत मजल

लोमरोर बाद

लोमरोर याला बाद करत आवेश खानने आरसीबीला सातवा धक्का

आरसीबीला सहावा धक्का

दिनेश कार्तिकच्या रुपाने आरसीबीला सहावा धक्का बसलाय. कार्तिक 11 धावा काढून बाद झाला.

पाटीदार बाद

आरसीबीचा अर्ध संघ तंबूत परतला.. पाटीदार 34 धावांवर बाद झाला. आवेश खानने घेतली विकेट... आरसीबी 5 बाद 122 धावा धावा

आरसीबीला लागोपाठ दोन धक्के

कॅमरुन ग्रीन याच्यानंतर मॅक्सवेलही तंबूत परतला. मॅक्सवेल याला खातेही उघडता आले नाही. आरसीबी चार बाद 97 धावा.... 

आरसीबीला तिसरा धक्का

 


कॅमरुन ग्रीनच्या रुपाने आरसीबीला तिसरा धक्का बसला आहे. अश्विनने ग्रीनला 27 धावांवर बाद केले. आरसीबी 3 बाद 97 धावा

आरसीबीला दुसरा धक्का

युजवेंद्र चहल यानं फॉर्मात असलेल्या विराट कोहलीला पाठवले तंबूत.. आरसीबीला दुसरा धक्का बसला

विराट कोहलीच्या नावावर मोठा विक्रम

आयपीएलमध्ये 8 हजार धावांचा पल्ला विराट कोहलीने पार केला. असा पराक्रम करणारा विराट पहिलाच खेळाडू





आरसीबीचं अर्धशतक

6 षटकानंतर आरसीबीने एक विकेटच्या मोबदल्यात 50 धावा केल्या आहेत. विराट कोहली आणि कॅमरुन ग्रीन मैदान

आरसीबीला पहिला धक्का

फाफ डू प्लेलिसला बाद, आरसीबीला पहिला धक्का... पॉवेलचा शानदार झेल... आरसीबी 1 बाद 37 धावा

विराट-फाफ मैदानात

विराट-फाफ फलंदाजीसाठी मैदानात आले आहेत. बोल्ट गोलंदाजीसाठी आलाय

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची  प्लेईंग XI :

 


फाफ डु प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, यश दयाल, लॉकी फर्ग्यूसन, कर्ण शर्मा आणि मोहम्मद सिराज


इम्पॅक्ट प्लेअर -  स्वप्निल सिंह, अनुज रावत

राजस्थान रॉयल्स प्लेईंग XI :

संजू सॅमसन (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमॅन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युजवेंद्र चहल


इम्पॅक्ट प्लेअर -   शिमरोन हेटमायर

राजस्थानची प्रथम गोलंदाजी

संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आरसीबी प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

आरसीबीच्या चाहत्यांची गर्दी

आरसीबीने चषक उंचवावा

आरसीबीने यंदाचा चषक जिंकावा, असे अंबाती रायडूने सांगितले. 

विजय मल्ल्याचं विराट कोहलीबाबत ट्विट

राजस्थानचे चाहते अहमदाबादला रवाना

एलिमिनेटरच्या सामन्यासाठी किंग कोहली सज्ज

ग्लेन मॅक्सवेलची तुफान फटकेबाजी

राजस्थान आजच्या सामन्यासाठी सज्ज

राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेईंग XI:

संजू सॅमसन (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमॅन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युजवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची संभाव्य प्लेईंग XI :


फाफ डु प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, रजत पाटीदार, कॅमेरुन ग्रीन, दिनेश कार्तिक, महिपाल लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, यश दयाळ, लॉकी फर्ग्यूसन, कर्ण शर्मा आणि मोहम्मद सिराज





 


वर्चस्व कोणाचं?


राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आयपीएलमध्ये 31 वेळा आमने सामने आले आहेत. आरसीबीनं 15 मॅच जिंकल्या आहेत. तर, आरसीबीनं 3 मॅच जिंकल्या आहेत. तीन मॅचचा निकाल लागला नाही.





 


अहमदाबादमध्ये एलिमिनेटरची लढत होणार


राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आज अहमदाबादमध्ये एलिमिनेटरची लढत होणार आहे. आजच्या मॅचमध्ये ज्याला विजय मिळेल त्या संघाला क्वालिफायर-2 मध्ये प्रवेश मिळेल. तिथं सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध त्यांची लढत होईल.





 


पार्श्वभूमी

IPL 2024 Rajasthan Royals vs Royal Challengers Bengaluru, Eliminator: आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या एलिमिनेटरचा सामना होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात जो संघ विजयी होईल, तो क्वालिफायरच 2 चा सामना कोलकाता नाइट रायडर्ससोबत खेळेल. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.