ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असते. आता, महापालिकेतील (KDMC) कंत्राटी भरती नियमांचे उल्लंघन करत अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची पत्नी डॉ. श्रुती कोनाले कल्याण डोंबिवली पहालिकेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी M.D. पॅथॉलॉजी या पदावर थेट 24 तासात भरती झाल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. सध्या पालिका आणि आरोग्य विभागात याची जोरदार चर्चा होत असून हे नियमाला डावलून करण्यात आल्याचं उघड होत आहे.  


नगर विकास विभाग यांनी घालून दिलेल्या भरती प्रक्रियेतील अहर्ता व अनुभव निर्धारित करण्यात आल्यानुसार भरती प्रक्रिया करावी असे सांगण्यात आले आहे. मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने कंत्राटी कामगार भरती संदर्भात कुठलीही जाहिरात दिली नाही त्याचप्रमाणे भरती केलेल्या डॉक्टर श्रुती गणपतराव कोनाले यांनी आयुक्तांच्या नावाने कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदावर नेमणूक होण्यासाठी विनंती अर्ज केला आहे. या अर्जात डॉ. श्रुती यांनी असे म्हटले आहे की, मी MD पॅथॉलॉजी डिसेंबर 2023 मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून हिंगणघाट येथील एका खासगी रुग्णालयात लॅब इंचार्ज पदावर काम केले असून मला 6 महिन्यांचा अनुभव आहे. मात्र, नगर विकास विभाग शासनाने नियमांच्या अधीन राहून भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश असताना डॉ श्रुती यांना MD पॅथॉलॉजी पदाचा 6 महिन्याचा अनुभव असताना वैद्यकीय अधिकारी पदावर भरती कसे केले हा सवाल उपस्थित झाला आहे.  


नगर विकास विभागाने शासन मान्यता आणि नियम


नगर विकास शासन निर्णय 1जून 2021 अन्वेषण कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे सेवा प्रवेश नियमांना शासन मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार नियुक्ती कामे अहर्ता व अनुभव निर्धारित करण्यात आलेले आहेत. वैद्यकीय अधिकारी एमडी पॅथॉलॉजी 


अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमडी पदव्युत्तर पदवी तथापि पदवीत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद उत्तर पदवीधारकांमधून डीसीपी डिप्लोमा इन क्लीनिकल पॅथॉलॉजी भरण्यात येईल
ब) शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील कामकाजाचा दोन वर्षाचा अनुभव आवश्यक


दरम्यान,डॉ. श्रुती यांनी कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदावर नेमणूक होण्यासाठी विनंती अर्ज आयुक्तांच्या नावाने केला खरा मात्र तो अर्ज आयुक्तांच्या दालनात न जाता परस्पर वैद्यकीय विभागात दाखल करण्यात आला. वैद्यकीय विभागाकडून डॉ. श्रुती गणपतराव कोनाले यांनी कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक मिळणे बाबत 10 ऑक्टोबर 2024 रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केला आहे असे म्हटले आहे. मात्र, हा अर्ज वैद्यकीय विभागाला सादर केला नसून आयुक्तांना सादर केल्याचे दिसून येत आहे
धक्कादायक बाब म्हणजे 10 ऑक्टोबर 2024 ला कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकारी पदावर नेमणूक होण्याबाबत अर्ज सादर केला, वैद्यकीय विभागाने सामान्य प्रशासनाकडे हा अर्ज पाठवला, सामान्य प्रशासनाचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड हे डॉक्टर श्रुती यांचे पती असून त्यांनी या भरती संदर्भात अभिप्राय दिला. वैद्यकीय विभागाच्या अभिप्रायानुसार मनुष्यबळाची आवश्यकता पाहता निवळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्त्वावर डॉक्टर श्रुती कोनाले यांची md पॅथॉलॉजी वैद्यकीय अधिकारी या पदावर पूर्णवेळ नियुक्ती करण्याच्या मान्यतेस्तव तथा आदेश स्वाक्षरीस्तव सादर असा अभिप्राय देत आयुक्त इंदूर राणी जाखड यांच्याकडे 11 ऑक्टोबर 2024 रोजी पाठवण्यात आला आहे. आयुक्त जाखड यांनी अतिरिक्त आयुक्तांनी दिलेल्या अभिप्रायानुसार डॉक्टर श्रुती कोनाले यांची भरती प्रक्रिया पूर्ण केली 


10 ऑक्टोबर 24 ला अर्ज दाखल 11 ऑक्टोबर 2024 ला भरती प्रक्रिया पूर्ण


शासकीय विभागामध्ये कंत्राटी कामगार अधिकारी भरती प्रक्रिया राबवत असताना नगर विकास खात्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून भरती करण्याची प्रक्रिया पार पाडण्याचे नियम असताना अधिकाऱ्यांनी एमडी पॅथॉलॉजी या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याची जाहिरात दिली नाही. कंत्राटी कामगार भरती पूर्णपणे गुपित ठेवली सामान्य प्रशासन विभागांमध्ये अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची पत्नी डॉक्टर श्रुती गायकवाड यांची थेट 24 तासात एमडी पॅथॉलॉजी वैद्यकीय अधिकारी पदावरती थेट भरती करण्यात आली या भरतीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरटीआय कार्यकर्ते गणेश ताटे यांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वतःच्या पत्नीला वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्त केले आहे, ते पद रिक्त करून हर्षल गायकवाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.  


उपायुक्त वंदना गुळवे यांचं स्पष्टीकरण 


एमबीबीएस डॉक्टरची मागणी असताना देखील एमबीबीएस डॉक्टर मिळत नाही त्यामुळे अर्ज प्राप्त होतात त्यामुळे त्या अर्जाचा सकारात्मक विचार करून नियुक्ती करण्यात येते. टीसीएस मार्फत जी भरती करतो ती भरती वर्ग 3 आणि वर्ग 4 साठी आहे वर्ग एक आणि दोन मध्ये वैद्यकीय अधिकारी पदे येतात त्यामध्ये डॉक्टर्स आणि स्पेशालिस्ट डॉक्टर्स नियुक्त करायचे आहेत कायमस्वरूपी त्याची जाहिरात राष्ट्रीय वृत्तपत्रात, वेबसाईटवर आणि ऑनलाईन देतो त्यामध्ये इंटरव्यू असतो रजिस्ट्रेशन होऊन चालू होण्यासाठी वेळ आहे. कायमस्वरूपी डॉक्टरांची नियुक्ती होईपर्यंत वैद्यकीय सेवा सक्षमपणे पुरवण्यासाठी कंत्राटी पद्धतीने विविध क्षेत्रातील स्पेशल डॉक्टरांची नियुक्ती केली जाते. आपण जी शासनाकडूनची तरतूद कोट करत आहात, ती कदाचित कायमस्वरूपी भरतीची पद्धत असू शकेल. पण,  कंत्राटी स्वरूपात एमबीबीएस डॉक्टरांसाठी दोन वर्षाचा अनुभव आहे, एमडी डॉक्टरसाठी दोन वर्ष अनुभवाची अट नाही. त्याकरता वैद्यकीय अधिकारी विभागाकडे याची छाननी करून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवले जातात जे प्रस्ताव आरोग्य विभाग उपायुक्त मुख्य वैद्यकीय अधिकारी यांची शिफारस सामान्य प्रशासन विभागाकडे येतात त्या अर्जांवरती पुढची प्रक्रिया केली जाते कंत्राटी पद्धतीचे आदेश आयुक्त यांच्या आदेशाने पारित केले जातात, असे उपायुक्त वंदना गुळवे यांनी म्हटलं आहे. 


नियुक्ती लवकर दिली हे स्वागतार्ह


कोणत्याही अधिकाऱ्याची पत्नी असणं हे काही गुन्हा नाही कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या क्वालिफिकेशनच्या नियुक्ती झालेली नाहीये कोणाचाही अधिकार डावलून कोणाचीही नियुक्ती झालेली नाहीये ड्यू प्रोसेस फॉलो करून ही नियुक्ती झालेली आहे. त्यामध्ये नियुक्ती लवकर झाली आहे हे स्वागत केलं पाहिजे. एमडी कोर्स हा दोन वर्षाचा अनुभवासारखा कोर्स आहे त्यामध्ये आपण काही स्टेटमेंट करणं त्यासाठी इतकी सक्षम नाही असे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. किती अर्ज प्राप्त झालेले आहे किती डॉक्टर्सला कंत्राटी स्वरूपात नियुक्ती दिलेली आहे ही माहिती काढायला सांगितले आहे, ती माहिती प्राप्त होताच पत्रकारांना ती माहिती देण्यात येईल असेही गुळवे यांनी सांगितले.


हेही वाचा


स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही; मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट विधानसभेतून टोला, आमदारांनी बाक वाजवला