(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 Latest Points Table: लखनौ चौथ्या स्थानावर, गुजरातची घसरण; आज केकेआरला अव्वल स्थान गाठणार?, पाहा Latest Points Table
IPL 2024 Latest Points Table: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सची गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे.
IPL 2024 Latest Points Table: आयपीएल 2024 च्या हंगामात काल लखनौ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bengaluru) पराभव केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला. लखनौच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत बरेच बदल झाले आहेत. लखनौ सुपर जायंट्स गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहेत. आता केएल राहुलच्या संघाचे 3 सामन्यांत 4 गुण झाले आहेत.
A win at home followed by a win away from home for the Lucknow Super Giants! 👏👏
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2024
They move to number 4⃣ on the Points Table!
Scorecard ▶️ https://t.co/ZZ42YW8tPz#TATAIPL | #RCBvLSG pic.twitter.com/uc8rWveRim
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सची गुणतालिकेत पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सचे 4-4 गुण असले तरी लखनौ सुपर जायंट्स संघाचा नेट रनरेट चांगला आहे. गुणतालिकेत संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर कायम आहे. राजस्थान रॉयल्सचे 3 सामन्यांत 6 गुण आहेत.
चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या क्रमांकावर-
कोलकाता नाईट रायडर्स व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सचे प्रत्येकी 4 गुण आहेत. पण चांगल्या नेट रन रेटमुळे कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्ज तिसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबाद 3 सामन्यांत 2 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. यानंतर अनुक्रमे दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आहेत. या संघांचे 2-2 गुण समान आहेत.
आज केकेआर अव्वल स्थान गाठणार?
आज आयपीएल 2024 च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात सामना रंगणार आहे. विशाखापट्टणम मैदानावर हा सामना होणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्स विजय मिळवण्यात यशस्वी ठरल्यास त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याची संधी असेल. त्याचवेळीदिल्ली कॅपिटल्सने विजय मिळवल्यास गुणतालिकेत वर जाण्याची संधी असेल. तथापि, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा नेट रनरेट सध्या खराब आहे.
IPL 2024 Points Table. pic.twitter.com/CJN70qw0WX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 2, 2024
संबंधित बातमया:
मोठी बातमी... ऐनवेळी आयपीएलच्या दोन सामन्याची तारीख बदलली, BCCI ची मोठी अपडेट