IPL 2024 Final: चेन्नईमध्ये IPL फायनलचा थरार, तिकिटांची विक्री सुरु, सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांचं?
IPL 2024 Final : आयपीएल 2024 मधील प्लेऑफचा थरार 21 मे पासून सुरु होणार आहे. सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यामध्ये क्वालिफायरचा सामना होणार आहे.
IPL 2024 Final : आयपीएल 2024 मधील प्लेऑफचा थरार 21 मे पासून सुरु होणार आहे. सनरायजर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यामध्ये क्वालिफायरचा सामना होणार आहे. तर राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यामध्ये एलिमेटरचा सामना होणार आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमेनटर हे दोन सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत. तर क्वालिफायर 2 आणि फायनलचा सामना चेन्नईमधील चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. आयपीएल 2024 फायनलच्या सामन्यासाठी तिकिटांची विक्री सुरु झाली आहे. पण हे तिकिट कसं खरेदी करता येईल, तिकिटांची किंमत किती असेल.. KKR, SRH, RR आणि RCB यातील दोन संघ फायनलमध्ये पोहचणार आहेत.
आयपीएल 2024 च्या फायनलसाठी तिकिटांच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या तिकिटाची किंमत 3,500 रुपये ठेवण्यात आली आहे आणि स्टँडनुसार किमत वाढत जाणार आहे. फायनलसाठी सर्वात महागड्या तिकिटाची किंमत 7,500 रुपये निश्चित करण्यात आली आहे. महत्वाचं म्हणजे, सध्या फक्त रुपे कार्ड असलेल्या चाहत्यांनाच ही तिकिटे खरेदी करू शकतात. तर इतर सर्व लोकांसाठी उद्यापासून (मंगळवार) तिकिटांची विक्री सुरू होणार आहे.
कसे खरेदी कराल फायनलचं तिकिट ?
Paytm Insider मोबाइल अॅपवर तुम्हाला तिकिटाची खरेदी करता येईल. सर्वात आधी Paytm Insider अॅप डाऊनलोड करा. त्यानंतर 'चेन्नई' शहराची निवड करा, कारण सामना तिथे होणार आहे. शहराची निवड केल्यानंतर आयपीएल 2024 फायनलचा पर्याय निवडा अन् क्लिक करा. फायनल मॅच टॅबवर क्लिक केल्यानंतर 'Buy Now' हा पर्याय निवडा. त्यायानंतर स्टेडियममधील उपलब्ध जागांमधून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही जागा निवडू शकता. आसनांची संख्या निश्चित केल्यानंतर तुम्हाला 'Add to Cart' वर क्लिक करावे लागेल. यानंतर पेमेंट करावे लागेल आणि तुमचे ई-तिकीट त्वरित बुक केले जाईल.
प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक
सामना |
तारीख |
प्रतिस्पर्धी संघ |
प्रतिस्पर्धी संघ |
कोणतं मैदान ? |
क्वालिफायर-1 Qualifier 1 |
21 मे 2024 |
कोलकाता नाईट रायडर्स Kolkata Knight Riders |
सनरायजर्स हैदराबाद Sunrisers Hyderabad |
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद Narendra Modi Stadium, Ahmedabad |
एलिमेनटर Eliminator |
22 मे 2024 |
राजस्थान रॉयल्स Rajasthan Royals |
आरसीबी Royal Challengers Bangalore |
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद Narendra Modi Stadium, Ahmedabad |
क्वालिफायर-2 Qualifier 2 |
24 मे 2024 |
क्वालिफायर-1 मधील पराभूत संघ LOSER Q1 |
एलिमेनटरमधील विजेता संघ WINNER ELIMINATOR |
एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई MA Chidambaram Stadium, Chennai |
Final |
26 मे 2024 |
क्वालिफायर-1 मधील विजेता संघ WINNER Q1
|
क्वालिफायर-2 मधील विजेता संघ WINNER Q2 |
एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई MA Chidambaram Stadium, Chennai |