एक्स्प्लोर

IPL 2024 CSK vs RR:  तुमच्या नियंत्रणात..., सलग तीन सामन्यात पराभव, कर्णधार संजू सॅमसनने सहकाऱ्यांना थेट सांगितले

IPL 2024 CSK vs RR: चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

IPL 2024 CSK vs RR: राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात काल झालेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारत 5 विकेट्सने हा सामना जिंकला. राजस्थानविरुद्धच्या विजयानंतर चेन्नईने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर रचिन रविंद्रने 27, डॅरिल मिचेलने 22, मोईन अलीने 10, शिवम दुबे 18,  रवींद्र जडेजा 5 आणि समीर रिझवीने 15 धावा केल्या. राजस्थानकडून रविचंद्रन अश्विनने 2 विकेट्स घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि नेंद्र बर्गरला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. राजस्थानचा सलग तिसरा पराभव झाला आहे. मात्र, राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर कायम असून प्ले ऑफमध्ये खेळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र, चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या पराभवानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

'मी माझ्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही...'

संजू सॅमसन म्हणाला की, तुम्ही प्ले ऑफबद्दल विचार करता हे अगदी सामान्य आहे, परंतु मी माझ्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर तुम्हाला काम करण्याची गरज आहे. आगामी सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल. तसेच आगामी सामन्यांमध्ये संघ अधिक चांगली कामगिरी करेल, असं संजू सॅमसनने सांगितले. तसेच पॉवरप्लेनंतर आम्ही 170 धावांपर्यंत मजल मारण्याची अपेक्षा करत होतो, परंतु तसे झाले नाही, असंही सॅमसन म्हणाला. 

राजस्थान रॉयल्स प्ले ऑफ खेळण्याची खात्री आहे, पण...

सध्या राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचे 12 सामन्यांत 16 गुण आहेत. वास्तविक, संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने हंगामाची धमाकेदार सुरुवात केली. राजस्थान रॉयल्सने पहिल्या 10 सामन्यांमध्ये 8 विजय नोंदवले, परंतु त्यानंतर विजयाची मालिका कायम राखण्यासाठी संघर्ष करावा लागला. आतापर्यंत फक्त कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहेत. याशिवाय राजस्थान रॉयल्स दुसऱ्या, चेन्नई सुपर किंग्स तिसऱ्या आणि सनरायझर्स हैदराबाद चौथ्या क्रमांकावर आहे.

राजस्थानकडून रियान परागच्या सर्वाधिक धावा-

राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी राजस्थानने 5 विकेट्स गमावत 141 धावा केल्या. राजस्थानकडून रियान परागने सर्वाधिक धावा केल्या. रियान परागने 35 चेंडूत 47 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 1 चौकार लगावला. यशस्वी जैस्वालने 24, जॉस बटलरने 21, संजू सॅमसनने 15 आणि ध्रुव जुरेलने 28 धावा केल्या. चेन्नईकडून सिमरजीत सिंगने 3 विकेट्स पटकावल्या. तर तुषार देशपांडे 2 विकेट्स घेण्यात यशस्वी राहिला.

संबंधित बातम्या:

चौकार, षटकार लगावत पहिले विराट कोहलीने डिवचले; बाद करताच इशांत शर्माची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video

Video: चेन्नईचा निरोप घेताना एमएस धोनीने सुरेश रैनाला मारली मिठी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पाहा Video

IPL 2024: 'तुम्हाला 400 कोटी रुपये मिळाले तर...', केएल राहुलसाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात, लखनौच्या मालकाला खडसावले!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं

व्हिडीओ

Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा
Solapur Funeral : MNS पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, हजारोनागरिक सहभागी, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Team India Squad Against New Zealand ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया जाहीर; दोघांची घरवापसी, पण मोहम्मद शमीकडे पुन्हा दुर्लक्ष!
Embed widget