एक्स्प्लोर

CSK New Captain: मराठमोळा ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार, एमएस धोनीचा राजीनामा

Chennai Super Kings New Captain: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. 

Chennai Super Kings New Captain: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला (ruturaj gaikwad) चेन्नई सुपर किंग्सचं कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. एमएस धोनीनं (MS Dhoni) कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यंदा चेन्नईची धुरा युवा ऋतुराज गायकवाड संभाळणार आहे. सीएसकेकडून सोशल मीडियावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. चेपॉकवर चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीची लढत होणार आहे. त्याआधी धोनीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिला, संघाची धुरा युवा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आली आहे. 

चेन्नईनं काय म्हटलं ?

चेन्नई सुपर किंग्सकडून ऋतुराज गायकवाडच्या कर्णधारपदाबाबत स्टेटमेंट जारी करण्यात आले आहे. "एमएस धोनीन आयपीएल 2024 आधी संघाची धुरा ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवली आहे. ऋतुराज गायकवाड 2019 पासून संघासोबत आहे. त्यानं आतापर्यंत 52 सामने खेळले आहेत."

धोनी सर्वात यशस्वी कर्णधार  

आगामी आयपीएल हंगामासाठी गुरुवारी सर्व 10 संघांच्या कर्णधारांचे एकत्र फोटोशूट झाले. यावेळी सीएसकेचा कर्णधार म्हणून धोनी दिसणार, असा सर्वांचा समज होता. पण प्रत्यक्षात झाले वेगळेच. धोनीच्या जागी सीएसकेचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाड याच्याकडे सोपवण्यात आले आहे. एमएस धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने पाच वेळा चषकावर नाव कोरलेय. 2019 मध्ये धोनीनं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो आयपीएल खेळत आहे. मागील काही वर्षांपासून धोनी आयपीएलमधून निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरु आहे. यावेळीही धोनी निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यातच आता चेन्नईचं नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आलेय.  तसे संकेतच फ्रँचायझीकडून गुरुवारी दिले गेले.

आयपीएल 2024 च्या पहिल्या टप्प्यातील चेन्नईचं वेळापत्रक - 

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8 वाजता
 
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, संध्याकाळी 7.30 वाजता
 
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 31 मार्च, वाइजैग, संध्याकाळी 7.30 वाजता
 
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, संध्याकाळी 7.30 वाजता 

Chennai Super Kings Players: यंदाच्या हंगामासाठी चेन्नईच्या ताफत कोण कोण?
अजय मंधवाल, अजिंक्य रहाणे, दीपक चहर, डेवॉन कॉनवे, महीश तिक्ष्णा, मथिशा पथिराणा, मिचेल सँटनर, मोईन अली, एमएस धोनी,मुकेश चौधरी, निशांत सिंधू, प्रशांत सोळंकी, राजवर्धन हंगारकेकर, रविंद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, शैख रशीद, शिवम दुबे, सिमरजीत सिंह, तुषार देशपांडे, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, शार्दूल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, रचिन रविंद्र, अविनाश रॉय 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget