विराट कोहलीच्या हातावर टॅटू काढण्यासाठी लागले 14 तास, आर्टिस्टने सांगितला अर्थ
Virat Kohli New Tattoo : आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने हातावर नवीन टॅटू काढलाय
Virat Kohli Tattoo : आरसीबीचा (Royal Challenegers Bangalore) माजी कर्णधार विराट कोहलीने हातावर नवीन टॅटू (Virat Kohli New Tattoo) काढलाय. हा टॅटू काढण्यासाटी आर्टिस्टला तब्बल 14 तास लागले. टॅटू काढणाऱ्या आर्टिस्टच्या मते, 'हा टॅटू विराट कोहलीच्या व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू दर्शवतो. ' विराट कोहलीच्या टॅटूला क्रीडा चाहते पसंती दर्शवतात. विराट कोहलीच्या या नव्या टॅटूलाही चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. चाहत्यांना विराट कोहलीचा हा नवीन टॅटू आवडला आहे. सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरु आहे.
एलियन्स टॅटूचे मालक आणि क्रिएटर सनी भानुशाली यांनी विराट कोहलीचा हा नवीन टॅटू काढला आहे. भानुशाली यांनी असा दावा केलाय की, काही दिवसांपूर्वी विराट कोहली नवीन टॅटू डिझायनचे फोटो घेऊन आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून भानुशाली विराट कोहलीचा चाहता आहे. टॅटू क्रिएटर म्हणाले की, 'क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहली आमच्या कामाचा चाहता असल्याचा विश्वास बसत नाही. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही विराट कोहलीचे पाय जमीनीवर आहेत. त्याला कोणताही गर्व अथवा घमेंड नाही. इतका मोठा स्टार असतानाही विराट कोहली सामन्यपणे राहतो...त्याने आमच्या कामाचे कौतुकही केले. तसेच त्याच्या पुढील टॅटूवर मी काम करावे, अशी इच्छाही आहे. '
भानुशाली म्हणाला की, विराट कोहलीच्या व्यस्त कार्यक्रमामुळे अनेक दिवसांपासून टॅटू काढता आला नाही. गेल्या महिन्यात विराट कोहलीने टॅटू काढण्यास सांगितले. विराट कोहलीला आपला जुना टॅटूसोबत नवीन टॅटू जोडायचा होता. नवीन टॅटूमधून अध्यात्माची झलक दिसावी, अशी विराट कोहली इच्छा होती. अध्यत्माला जोडणारा टॅटू करण्याची विराट कोहलीची इच्छा होती. जे सर्व गोष्टींच्या परस्परसंबंधाचे प्रतिनिधित्व करेल आणि स्वतः निर्मितीचा स्त्रोत असेल. काहीतरी जे उदात्तता आणि ऐक्य, जीवनाची रचना, सर्वांचा स्रोत दर्शवेल, असा विराट कोहलीला टॅटू हवा होता.
भानुशाली म्हणाला की, विराट कोहलीसाठी नवीन टॅटू खूप महत्वाचा होता. हातावर असलेल्या टॅटूसोबत नवीन टॅटू काढायचा होता. त्यासाठी मला पूर्ण क्षमतेने काम करावे लागले. तसेच काळजी घ्यावी लागली. टॅटू काढण्यासाठी 14 तासांचा कालावधी लागला. या कालावधीत स्टूडिओ पूर्णपणे बंद होता. तसेच सर्व सुरक्षेची काळजी घेतली. सीआरफीएफचे सैनिक स्टुडिओबाहेर होते. विराट कोहली टॅटूच्या प्रक्रियेत मग्न झाला होता. टॅटू पूर्ण झाल्यानंतर विराटने आश्चर्याने नवीन टॅटूकडे पाहिले. यावरुन टॅटू कलाकाराने असा निष्कर्ष काढला की "त्याला माहित होते की हा टॅटू आयुष्यभर त्याच्यासोबत असेल. त्याच्या आध्यात्मिक प्रवासाचे एक शक्तिशाली प्रतीक आणि त्याच्या स्वतःपेक्षा मोठ्या गोष्टीशी त्याचा संबंध असेल."