IPL सामन्यावर लातूरमध्ये सट्टा, पोलिसांनी सहा जणांना ठोकल्या बेड्या
IPL 2023 : आयपीएल सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या सहा जणांना लातूर पोलिसांनी अटक केलेय.
IPL 2023 : क्रिकेट सट्टेबाजाची पेव आता लातूरपर्यंत पोहचलेय. होय आयपीएल सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या सहा जणांना लातूर पोलिसांनी अटक केलेय. अहमदपूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करत सहा जणांना बेड्या ठोकल्यात. सहा जणांना ताब्यात घेतली अन् तीन व्यक्ती फरार झाल्या आहेत. जिल्हाभरात टोळी सक्रिय असल्याचा संशय आहे. पोलीस मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे. आयपीएल सामन्यावर लातूरमध्ये ऑनलाईन सट्टा लावलात जात होता. याची चाहूल पोलिसांना लागली, त्यानंतर तात्काळ कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात बुधवारी दिवसभर आणि रात्री पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे . यात मोबाईलवरून आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. संध्याकाळी छापा मारून 5 लाख 68 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमाला ताब्यात घेण्यात आला आहे. या छापेमारीत 6 व्यक्तींना जेरबंद करण्यात आले आहे. तर यातील 3 व्यक्ती फरार झाल्या आहेत. अहमदपूर व चाकूर उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी ही कारवाई केली आहे.
सध्या आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु आहे, याचा फिव्हर संपूर्ण देशात सुरु आहे. त्यावर सट्टेबाजी खूप मोठ्या प्रमाणात सुरू असल्याच्या चर्चा गावोगावी होत आहेत. मात्र यातील कार्यरत टोळी काही केल्या सापडत नाही. अहमदपूर व चाकूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना सट्टेबाजाबद्दल माहिती मिळाली. अहमदपूर शहरामध्ये काही व्यक्ती मोबाईल फोनवर ऑनलाईन आयपीएल क्रिकेट मॅचवर बेकायदा पैसे लावून सट्टा खेळत असल्याचे समजले. तीन पथके नेमून मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले. त्यावरून पथकातल्या पोलिसांनी अहमदपूर शहरात वेगवेगळ्या तीन ठिकाणी एकाच वेळी छापा मारला. तेव्हा काही इसम मोबाईल फोनवर काही तरी खेळताना आणि वहीमध्ये आकडेमोड करताना मिळून आले. सर्व साहित्य तपासले असता यातील 6 लोक हे मोबाईलवर सट्टा घेत असल्याचा आढळून आले.त्या ठिकाणचे तीन लोक फरार झाले होते .
फरार संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.. अहमदपूर मध्येच नऊ लोकांची टोळी मोबाईल वरून सत्ता घेण्यामध्ये व्यस्त असल्याचा आढळून आल्याने पोलिसांनी आता जिल्ह्याभरात यंत्रणा सक्रिय केली आहे.. सट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केला जातो. अहमदपूर असलेल्या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण याचा तपास आता लातूरमध्ये सुरू आहे. अहमदपूर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. यातील फरार आरोपीचा शोध सुरू असून मुख्य सूत्रधार कोण त्याचाही तपास पोलीस करत आहेत.