'KGF' यंदा आरसीबीला चॅम्पियन करणार का ? पाहा 2022 ची कामगिरी
IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आरसीबी रविवारी आपल्या आयपीएल अभियाला सुरुवात करणार आहे.
Faf du Plessis Virat Kohli Glenn Maxwell IPL 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आरसीबी रविवारी आपल्या आयपीएल अभियाला सुरुवात करणार आहे. आरसीबीच्या चाहत्यांना यंदा केजीएफकडून आपेक्षा आहेत... केजीएफ म्हणजे... विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस होय... आरसीबीचे खेळाडू या तिघांना केजीएफ म्हणतात... कोहली, ग्लेन आणि फाफ यांच्या नावाचा शॉर्टकट करत चाहत्यांनी केजीएफ असे नाव दिलेय. हे तिन्ही खेळाडू अनुभवी तर आहेतच... त्याशिवाय एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे.. केजीएफ यंदा तरी आरसीबीला जेतेपद मिळून देणार का? अशी चर्चा सुरु आहे.पाहूयात केजीएफची आयपीएलमधील कामगिरी
आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात सातव्या क्रमांकावर होता. त्याने 16 सामन्यात 468 धावांचा पाऊस पाडला होता.यादरम्यान फाफने तीन अर्धशतके झळकावली होती. 2022 मध्ये आरसीबीकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूत फाफ पहिल्या क्रमांकावर होता.
ग्लेन मॅक्सवेल विस्फोटक फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याला बिग शो म्हणून क्रिकेटमध्ये ओळखतात. त्याने आरसीबीसाठी अनेकदा मॅच विनिंग खेळी केली आहे. गेल्या हंगामात मॅक्सवेल याने 13 सामन्यात 301 धावा केल्या होत्या. यादरम्यान एक अर्धशतक झळकावले होते. विराट कोहलीला फॉर्म पुन्हा गवसला आहे. गेल्या काही दिवसांत विराट कोहलीची बॅट पुन्हा तळपताना दिसत आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने शतकांचा पाऊस पाडला आहे. नेटमध्येही विराट कोहली सराव करताना लयीत दिसला. 2016 प्रमाणे विराट कोहली यंदा धावांचा पाऊस पाडू शकतो. 2016 मध्ये विराट कोहलीने 900 धावा केल्या होत्या.
गेल्या हंगामात आरसीबीची कामगिरी कशी ?
2022 मध्ये आरसीबीने प्लेऑफ मध्ये जागा मिळवली होती. फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वात आरसीबीने 14 सामन्यात 8 विजय मिळवले होते तर सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. गतवर्षी आरसीबीचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर होता. एलिमिनेटर सामन्यात आरसीबीने लखनौ सुपर जाएंट्स संघाचा 14 धावांनी पराभव केला होता. पण दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून सात विकेटने पराभव स्विकारावा लागला होता. रविवारपासून आरसीबी आपल्या यंदाच्या आयपीएलचा शुभारंभ करणार आहे. आतापर्यंत आरसीबीला एकदाही चषक उंचावता आलेला नाही. पण यंदा केजीएफ आरसीबीला चषक उंचावून देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संतुलित दिसतोय आरसीबीचा संघ -
आयपीएल 2023 मध्ये आरसीबीचा संघ इतर संघाच्या तुलनेत अधिक संतुलित दिसतोय. फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, फिन एलन, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिक यासारखे दर्जेदार फलंदाज आहेत. तर गोलंदाजीत हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि जोश हेजलवुड यासराखे गोलंदाज आहेत. त्याशिवाय वानंदु हसरंगा आणि शाहबाज अहमद यांच्यासारखे फिरकीपटू आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकतो.