एक्स्प्लोर

IPL 2023 : गुजरातचा प्लेऑफमध्ये प्रवेश, मुंबई-चेन्नईला किती संधी, पाहा सविस्तर

IPL 2023 Playoffs chances : हैदराबादचा पराभव करत गुजरातने प्लेऑफमध्ये आरामात प्रवेश केला आहे.

IPL 2023 Playoffs chances : हैदराबादचा पराभव करत गुजरातने प्लेऑफमध्ये आरामात प्रवेश केला आहे. दिल्ली आणि हैदराबाद या संघाचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. आता सात संघ, आठ सामने यामध्ये प्लेऑफचे तीन संघ ठरणार आहेत. पण कोणत्या संघाला प्लेऑफची किती संधी आहे.. याबाबत जाणून घेऊयात.. 

दिल्ली-हैदराबादचा गाशा गुंडाळला - 

दिल्ली आणि हैदराबाद या संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आलेय. दिल्लीचा संघ दहाव्या स्थानावर आहे. दिल्लीचे 12 सामन्यात फक्त आठ गुण आहेत. दिल्लीने आठ सामने गमावले आहेत. एडन मार्करमच्या नेतृत्वातील हैदाराबादची अवस्थाही दैयनिय झाली. हैदराबादला 12 सामन्यात फक्त चार विजय मिळवता आलेत. 

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. गतविजेता गुजरात प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरलाय. गेल्यावर्षीही गुजरातने सर्वात आधी प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. दिल्ली आणि हैदराबाद संघाचे प्लेऑफचे आव्हान संपलेय. पाहूयात कोणत्या संघाला किती टक्के संधी आहे.. 

IPL 2023 Playoffs chances:

GT - QUALIFIED. 
CSK - 90%.
MI - 80%.
LSG - 61%.

RCB - 31%.
PBKS - 21%.
RR - 11%.
KKR - 6%.
SRH - 0%.
DC - 0%.

गुणतालिकेतील स्थिती काय ?

गुजरातचा संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातने 13 सामन्यात नऊ विजय मिळवले आहेत. गुजरातचा संघ 18 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातचा संघ क्वालिफायर 1 खेळणार हे नक्की झालेय. गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर चेन्नई आहे.. चेन्नईचे 13 सामन्यात 15 गुण आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मुंबचे 12 सामन्यात 14 गुण आहेत. चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या लखनौचे 12 सामन्यात 13 गुण आहेत. 

इतर 4 संघाची स्थिती काय ?

आरसीबी, राजस्थान, कोलकाता आणि पंजाब या चारही संघाचे प्रत्येकी 12 गुण आहेत. आरसीबी आणि पंजाब या संघाचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे जास्त चान्स आहेत. पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या आरसीबीचे 12 सामन्यात 12 गुण आहेत.. त्यांचे दोन सामने बाकी आहेत.. तर सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या राजस्थानचे 13 सामन्यात 12 गुण आहेत. सातव्या क्रमांकावर असणाऱ्या कोलकात्याचेही 13 सामन्यात 12 गुण आहेत. कोलकाता आणि राजस्थान यांचे प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. दोघांचे प्लेऑफमधील आव्हान इतर संघाच्या सामन्यावर आहेत. आठव्या क्रमांकावर असणाऱ्या पंजाबचे प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. पंजाबचे 12 सामन्यात 12 गुण आहेत. उर्वरित दोन्ही सामने चांगल्या फरकाने जिंकल्यास प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. 

आणखी वाचा :

GT in IPL Playoffs: गतविजेत्याची यशस्वी घौडदोड, यंदा क्वालिफाय होणारा गुजरात पहिला संघ
SRH In IPL 2023 : हैदराबादच्या नवाबांचे आयपीएलमधील आव्हान संपले, मुंबई-आरसीबीची डोकेदुखी वाढली
IPL 2023, GT vs SRH : शमी-शर्माचा भेदक मारा, गुजरातचा हैदराबादवर 32 धावांनी विजय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget