(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरात-चेन्नईचा प्लेऑफमधील प्रवेश जवळपास निश्चित, इतर संघाची स्थिती काय?
IPL 2023 Playoffs Chances : आयपीएल उत्तरार्धाकडे झुकलेय.. प्रत्येक सामना रंगतदार होत आहे.
IPL 2023 Playoffs Chances Teams : आयपीएल उत्तरार्धाकडे झुकलेय.. प्रत्येक सामना रंगतदार होत आहे. दहा संघाला अद्याप प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. प्रत्येक संघ प्लेऑफची तयाराही करत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात आणि धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई यांची प्लेऑफमध्ये पोहचण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. गुजरात संघाची प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता ९१ टक्के आहे.. तर चेन्नईची शक्यता ७८ टक्के आहे.
कोलकाता, दिल्ली आणि हैदराबाद या तीन संघाचे प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता सर्वात कमी आहे. दिल्लीची शक्यता ११ टक्के इतकी आहे. तर हैदराबादची शक्यत फक्त चार टक्के आहे. कोलकाता प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता १२ टक्के इतकी आहे. दिल्लीकडून पराभूत झाल्यानंतर आरसीबीची प्लेऑफमध्ये पोहचणे खडतर झालेय. आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता फक्त ३४ टक्के इतकी आहे. तर मुंबईची शक्यता ३६ टक्के आहे.
प्लेऑफमध्ये पोहचण्याची कोणत्या संघाला किती संधी? IPL 2023 Playoffs Chances:
गुजरात, GT - 91%
चेन्नई CSK - 78%
लखनौ LSG - 58%
राजस्थान RR - 42%
मुंबई MI - 36%
बेंगलोर RCB - 34%
पंजाब PBKS - 31%
कोलकाता KKR - 12%
दिल्ली DC - 11%
हैदराबाद SRH - 4%
प्ले ऑफच्या स्पर्धेत कोणते संघ कुठे आहेत ?
सध्या प्लेऑफच्या शर्यतीत गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) आघाडीवर आहेत. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाकडे सध्या 11 गुण आहेत. सध्या गुणतालिकेत टॉप-4 मध्ये गुजरात टायटन्स संघासह चेन्नई सुपर किंग्स (CSK), लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि राजस्थान रॉयल्स (RR) या संघांचा समावेश आहे. इतर संघांची परिस्थिती पाहिली तर राजस्थान रॉयल्स (RR), रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB), मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) अनुक्रमे चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. मात्र, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स संघाकडे 10-10 गुण आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आठव्या क्रमांकावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत 10 सामने खेळले असून 4 सामने जिंकले आहेत. तर त्यांना 6 सामन्यांत पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स नवव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचे 8 गुण आहेत. सनरायझर्स हैदराबाद सर्वात शेवटी दहाव्या क्रमांकावर आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाकडे दहा सामन्यांनंतर 6 गुण आहेत.
IPL 2023 Playoffs Chances:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 6, 2023
GT - 91%
CSK - 78%
LSG - 58%
RR - 42%
MI - 36%
RCB - 34%
PBKS - 31%
KKR - 12%
DC - 11%
SRH - 4%