एक्स्प्लोर

IPL 2023 Playoff Equation: पराभवामुळे पंजाब अडचणीत, प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर, 'हे' तीन संघ क्वॉलिफाय होणार?

IPL 2023 Playoff Equation: आयपीएल 2023 चे लीग सामने जवळपास संपले आहेत, परंतु अद्याप गुजरात व्यतिरिक्त कोणताही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही.

IPL 2023 Playoff Equation: आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्लेऑफमधील चार संघांचे चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. स्पर्धेत फक्त 6 साखळी सामने शिल्लक आहेत. बुधवारी, 17 मे रोजी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीनं विजय नोंदवून पंजाबच्या प्लेऑफच्या आशा जवळपास संपुष्टात आणल्या. आता पंजाबला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेलच, मात्र इतर संघांच्या खेळावरही लक्ष ठेवावं लागेल. 

गुजरातशिवाय कोणत्या संघांना पात्र ठरण्याची संधी?

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) : चेन्नई सुपर किंग्ज 15 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. संघ आपला शेवटचा सामना दिल्लीविरुद्ध खेळणार असून हा सामना जिंकून चेन्नई थेट प्लेऑफसाठी पात्र ठरेल. जर संघ हा सामना हरला तर पात्र होण्यासाठी त्यांना लखनौ, मुंबई आणि बंगळुरूच्या निकालांवर अवलंबून राहावं लागेल.

लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) : लखनौचा संघ पॉईंट टेबलमध्ये 15 गणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. लखनौ केकेआरच्या विरोधात साखळी सामन्याचा शेवटचा सामना खेळणार आहे. या सामन्यात विजय मिळवून थेट प्लेऑफमध्ये जाण्याच्या प्रयत्नात लखनौ दिसेल, मात्र जर लखनौचा पराभव झाला तर मात्र लखनौला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नई, मुंबई आणि बंगळुरू यांच्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. 

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) : मुंबईला टॉप-4 मध्ये जागा बनवण्यासाठी हैदराबादच्या विरोधातील सामन्यात जिंकावंच लागेल. याव्यतिरिक्त मुंबईला आरसीबीनं कमीत कमी एक सामना हरावा यासाठीही प्रार्थना करावी लागेल. मुंबई पॉईंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) : आरसीबी पॉईंट टेबलमध्ये 12 पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. अजुनही दोन साखळी सामने शिल्लक आहेत. बंगळुरूला प्लेऑफमध्ये क्वॉलिफाय होण्यासाठी दोन्ही सामने जिंकावे लागतील. जर आरसीबीनं दोन्ही सामने जिंकले तर आरसीबी थेट पॉईंट टेबलमध्ये टॉप-4 मध्ये पोहोचण्यासाठी मुंबईचा अखेरच्या साखळी सामन्यात पराभव व्हावा, अशी प्रार्थना करावी लागेल. 

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) : राजस्थान 13 सामन्यांत 12 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघाला शेवटचा सामना कोणत्या परिस्थितीत जिंकावाच लागेल. तसेच, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि पंजाब या संघांकडून सर्व सामन्यांत पराभूक होण्याची अपेक्षा करावी लागेल. याशिवाय संघाला चांगल्या नेट रनरेचीही गरज आहे. 

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) : कोलकाताचा संघ 13 सामन्यांत 12 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच्या तिकिटासाठी संघाला शेवटचा सामना जिंकावा लागेल, तसेच मुंबई, बंगळुरू, राजस्थान आणि पंजाब या संघांचा त्यांच्या शेवटच्या सामन्यात पराभव व्हावा अशी प्रार्थना करावी लागेल. यासोबतच संघाला चांगल्या नेट रनरेटचीही गरज असेल.

पंजाब किंग्स (Punjab Kings)  : पंजाबला टॉप-4 मध्ये जाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे. संघ 13 सामन्यांत 12 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. संघाला शेवटच्या सामन्यातील विजयासह उर्वरित संघांच्या निकालावर अवलंबून राहावं लागेल आणि त्यांच्या संघाला चांगल्या नेट रनरेटची देखील आवश्यकता असेल.

दरम्यान, पॉईंट टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर असलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि दहाव्या क्रमांकावर असलेला दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) प्लेऑफच्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर आहेत, म्हणजेच दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

DC Vs PBKS: दिल्लीचा पंजाबवर विजय, पण आधीच झालेत प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर, मग कालच्या विजयानं नेमकं मिळालं तरी काय?

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जुलै 2025 | बुधवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जुलै 2025 | बुधवार
Marathi Morcha : मराठी मोर्चा प्रकरणात पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली; मधुकर पांडे यांच्या जागी निकेत कौशिक नवे आयुक्त
मिरा भाईंदर मराठी मोर्चा रोखण्याचे प्रयत्न भोवले, पोलीस आयुक्तांची बदली, निकेत कौशिक नवे आयुक्त
Uddhav Thackeray: गिरण्यांच्या जागेवर माॅल, टाॅवर उभे राहिलेत, गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावे; उद्धव ठाकरे कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मैदानात
गिरण्यांच्या जागेवर माॅल, टाॅवर उभे राहिलेत, गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावे; उद्धव ठाकरे कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मैदानात
SIP : गुंतवणूकदारांचा SIP वरील विश्वास वाढला, जून महिन्यात एसआयपीद्वारे गुंतवणूक वाढली, नवी आकडेवारी समोर
SIP द्वारे म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा उच्चांक, जून महिन्याची नवी आकडेवारी समोर, AMFI कडून माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Miraroad MNS Morcha Public Reaction : चहा, चर्चा, मनसेचा मोर्चा; मीरारोडच्या नागरिकांच्या मनात काय?
Ajit Pawar On Bhaskar Jadhav : निधी वाटपावरुन जाधवांचा टोला, अजित पवारांनी जाधवांना झाप झापलं
Sanjay Gaikwad : 'निकृष्ट दर्जाचे अन्न देत असल्यानं, कंत्राट रद्द करण्याची मागणी करणार'
Heavy Rains | नागपूरमध्ये मुसळधार पाऊस, पूरसदृश स्थिती; एक जण वाहून गेला, शाळांना सुट्टी
Marathi vs Hindi : निशिकांत दुबेंपाठोपाठ आता सपाच्या खासदारांनाही कंठ फुटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जुलै 2025 | बुधवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जुलै 2025 | बुधवार
Marathi Morcha : मराठी मोर्चा प्रकरणात पोलीस आयुक्तांची तडकाफडकी बदली; मधुकर पांडे यांच्या जागी निकेत कौशिक नवे आयुक्त
मिरा भाईंदर मराठी मोर्चा रोखण्याचे प्रयत्न भोवले, पोलीस आयुक्तांची बदली, निकेत कौशिक नवे आयुक्त
Uddhav Thackeray: गिरण्यांच्या जागेवर माॅल, टाॅवर उभे राहिलेत, गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावे; उद्धव ठाकरे कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मैदानात
गिरण्यांच्या जागेवर माॅल, टाॅवर उभे राहिलेत, गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळावे; उद्धव ठाकरे कामगारांच्या हक्काच्या घरासाठी मैदानात
SIP : गुंतवणूकदारांचा SIP वरील विश्वास वाढला, जून महिन्यात एसआयपीद्वारे गुंतवणूक वाढली, नवी आकडेवारी समोर
SIP द्वारे म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचा उच्चांक, जून महिन्याची नवी आकडेवारी समोर, AMFI कडून माहिती
Mumbai Metro 3 : आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने टीकेचा सामना, कंत्राटदार कंपनीला 10 लाखांचा दंड, नवी माहिती समोर
आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशनमध्ये पाणी शिरल्याने कंत्राटदाराला दणका, 10 लाखांचा दंड
Mutual Fund : पाच महिन्यांचा ट्रेंड जूनमध्ये बदलला, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वाढली, AMFI कडून आकडेवारी जाहीर
बाजारातील अनिश्चिचता वाढूनही म्युच्युअल फंडवर गुंतवणूकदारांचा विश्वास, इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक वाढली
Rahul Gandhi: महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगाचे आयुक्त भाजप-आरएसएससारखे बोलू लागले; राहुल गांधींचा गंभीर आरोप
महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगाचे आयुक्त भाजप-आरएसएससारखे बोलू लागले; राहुल गांधींचा गंभीर आरोप
Google Pay Laon : गुगल पेवरुन कर्ज घेण्याचा विचार करताय? अ‍ॅपवरुन कर्ज घेताना सतर्कता गरजेची, फायदा अन् नुकसान, महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या...
गुगल पेवरुन कर्ज घेण्याचा विचार करताय? फायदा अन् नुकसान, महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या...
Embed widget