IPL 2023 Orange And Purple Cap Race : ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी चुरशीची लढत, 'हे' खेळाडू आघाडीवर
ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी प्रत्येक खेळाडूमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते.
IPL 2023 Orange And Purple Cap Race : इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंना विशेष सन्मान दिला जातो. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप ( Orange Cap) दिली जाते. तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप (Purple Cap) दिली जाते. ऑरेंज आणि पर्पल कॅप कधी एका खेळाडूच्या डोक्यावर असते तर कधी पुढच्या सामन्यात दुसऱ्या खेळाडूच्या डोक्यावर असते. या दोन्ही कॅपसाठी प्रत्येक खेळाडूमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळते. आयपीएल 2023 मध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोणते खेळाडू आहेत हे पाहूया,
ऑरेंज कॅपच्या ( Orange Cap) शर्यतीत कोणते खेळाडू?
IPL 2023 ची ऑरेंज कॅप ( Orange Cap) सध्या शिखर धवनकडे आहे. या मोसमात त्याने आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. शिखर धवनने (Shikhar Dhawan) 4 सामन्यांच्या सर्व डावांमध्ये दोनदा नाबाद राहून सर्वाधिक 233 धावा केल्या आहेत. त्याने 2 अर्धशतकेही झळकावली आहेत. आयपीएल 2023 मधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 99 आहे. मात्र, ऑरेंज कॅपसाठी त्याला डेव्हिड वॉर्नर आणि जोस बटलर यांचे कडवे आव्हान आहे. डेव्हिड वॉर्नरने 209 आणि जोस बटलरने 204 धावा केल्या आहेत. याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांचाही ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आहेत. ऋतुराजने 197 आणि शुभमनने 183 धावा केल्या आहेत.
पर्पल कॅपच्या (Purple Cap)शर्यतीत कोणते खेळाडू?
इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये पर्पल कॅप (Purple Cap)साठी गोलंदाजांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. सध्या पर्पल कॅप युझवेंद्र चहलकडे (Yuzvendra Chahal) आहे. आयपीएलच्या 16 व्या मोसमात त्याने आतापर्यंत सर्वाधिक 10 विकेट घेतल्या आहेत. या मोसमात 17 धावांत 4 बळी घेतल्याने चहलची आत्तापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे. रशीद खान आणि मार्क वुड त्याला पर्पल कॅपसाठीच्या स्पर्धेत कायम आहेत. या दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत 9-9 विकेट घेतल्या आहेत. त्यांच्याशिवाय अल्झारी जोसेफ, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी आणि तुषार देशपांडे हे देखील पर्पल कॅपच्या शर्यतीत आहेत. या सर्व गोलंदाजांनी आतापर्यंत 7-7 विकेट घेतल्या आहेत.
कोणता संघ, कोणत्या स्थानावर?
गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स संघ अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकारवर संघाकडे प्रत्येकी 2 गुण आहेत. पण नेट रनरेटमुळे त्याचं स्थान बदललं आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सातव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद संघाकडे प्रत्येकी दोन गुण आहे. मुंबई आठव्या आणि हैदरबाद नवव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाला अद्याप एकही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे संघाला गुणतालिकेत अद्याप खातंही उघडता आलेलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
KKR vs SRH Match Preview : कोलकाता विरुद्ध हैदराबाद लढत, कुणाचा पारड जड? पाहा हेड टू हेड आकडेवारी