चेन्नईसाठी धोनी आज करणार द्विशतक, असा करणारा पहिलाच खेळाडू
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि चेन्नईच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे.
MS Dhoni Plays 200th Match As Chennai Super Kings Captain: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि चेन्नईच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. धोनी आयपीएलमध्ये खास द्विशतक पूर्ण करणार आहे. एम एस धोनी चेन्नईसाठी आज 200 व्या सामन्यात नेतृत्व करणार आहे. दोनशे सामन्यात अथवा त्यापेक्षा जास्त सामन्यात नेतृत्व करणारा धोनी पहिल खेळाडू ठरणार आहे. सोशल मीडियावर धोनीचे कौतुक केले जात आहे. 2008 पासून धोनी चेन्नई संघाचा कर्णधार आहे. गतवर्षी सुरुवातीला रविंद्र जाडेजाकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते, मात्र हंगमाच्या अखेरीस पुन्हा एकदा धोनीकडेच नेतृत्व सोपवण्यात आलेय. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आतापर्यंत यशस्वी कामगिरी केली आहे. चेन्नईले जवळपास प्रत्येक हंगमात प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवलाय. त्याशइवाय चषकावर नावही कोरलेय.
आयपीएलमध्ये एखाद्या संघासाठी सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. पण सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. धोनी आझ दोनशेव्या सामन्यात चेन्नईचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात थरणार आहे. चेन्नईसाठी धोनीने याआधीच २०० सामन्यात नेतृत्व केलेय.. चॅम्पिन्स लीग टी २० सामन्यादरम्यान धोनीने कर्णधार होता. आता फक्त आयपीएलमध्ये धोनी चेन्नईसाठी २०० व्या सामन्यात नेतृत्व करणार आहे.
MS Dhoni will be playing his 200th match as CSK captain tonight.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 12, 2023
One of the greatest ever in history! pic.twitter.com/zbGOV78koA
एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने चारवेळा आयपीएल चषक उंचावलाय. २०१०, २०११ नंतर २०१८ आणि २०२१ मध्ये चेन्नईने आयपीएल चषकावर नाव कोरलेय. सर्वाधिक वेळा आयपीएल फायनल खेळण्याचा विक्रमही चेन्नईच्या नावावर आहे. त्याशिवाय सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहचण्याचा विक्रमही चेन्नईच्या नावावर आहे. हे सर्व धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने विक्रम केलाय.
एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने १९० सामन्यात १२० विजय मिळवले आहेत. तर ७८ वेळा चेन्नईचा पराभव झालाय. एका सामन्यात कोणताही निर्णय झाला नाही. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईच्या विजयाची टक्केवारी ६० इतकी आहे. गेल्यावर्षी धोनीने जाडेजाकडे नेतृत्व सोपवले होते. पण जाडेजाच्या नेतत्वात चेन्नईला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे जाडेजाने पुन्हा एकदा धोनीकडे कर्णधारपद सोपवले.