RR vs LSG : नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने, पाहा दोन्ही संघाची प्लेईंग 11
Toss Update : सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे
Indian Premier League 2023 Match 26, Toss Update : सवाई मानसिंह स्टेडियमवर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चार वर्षानंतर राजस्थान आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहे. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेय. संजू सॅमसन याने आपल्या संघात एक महत्वाचा बदलही केलाय. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू जेसन होल्डर तंदुरुस्त झाला असून त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय.
राजस्थान आणि लखनौ या दोन्ही संघांनी आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. राजस्थानचा संघ पाच सामन्यात चार विजय मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. तर लखनौ सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आजचा सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिल... राजस्थान पहिले स्थान कायम राखण्यासाठी मैदानात उतरेल तर लखनौ पहिल्या स्थानावर झेप घेण्यासाठी उतरणार आहे.
Rajasthan Royals Skipper Sanju Samson wins the toss and elects to bowl first in their first home game in Jaipur.
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2023
Live - https://t.co/gyzqiryPIq #TATAIPL #RRvLSG #IPL2023 pic.twitter.com/58U0FhChXJ
दोन्ही संघाची प्लेईंग 11 -
राजस्थान रॉयल्स -
जोस बटलर, यशस्वी जायसवाल, संजू सॅमसन (कर्णधार, विकेटकीपर), रियान पराग, शिमरोन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, जेसन होल्डर, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल.
लखनौ सुपर जायंट्स -
केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, कृणाल पांड्या, निकोलस पूरन (विकेटकीपर), आयुष बडोनी, आवेश खान, युद्धवीर सिंह चरक, नवीन उल हक आणि रवि बिश्नोई.
LSG vs RR IPL 2023 : हेड टू हेड आकडेवारी पाहा काय सांगते...
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये लखनौ (LSG) आणि राजस्थान (RR) या दोन संघांमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये राजस्थान संघाचं पारड जड दिसून आलं आहे. राजस्थानने दोन्ही सामने जिंकले आहेत. तर, हैदराबाद संघाला एकही सामने जिंकता आलेला नाही. आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Sawai Mansingh Stadium Pitch Report : सवाई मानसिंग स्टेडिअमची खेळपट्टी कशी आहे?
यंदाच्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील सवाई मानसिंग स्टेडियमवरील हा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. या मैदानावर फक्त एकच टी20 सामना खेळला गेला आहे. ही खेळपट्टी चांगली फलंदाजांसाठी फायदेशीर आहे. तसेच फिरकीपटूंनाही खेळपट्टीची मदत होऊ शकते. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यांमधील मागील काही सामने आणि निकालांचा विचार करता नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा विचार करेल.