Happy Birthday Suryakumar Yadav: आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची षटकारानं सुरुवात, सूर्यकुमारच्या काही खास रेकॉर्डवर एक नजर
Happy Birthday Suryakumar Yadav: भारताचा युवा आणि मधल्या फळीचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आज त्याचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे.
Happy Birthday Suryakumar Yadav: भारताचा युवा आणि मधल्या फळीचा फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आज त्याचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे. सूर्यकुमार यादवनं भारताच्या अनेक विजयात मोलाटा वाटा उचलला आहे. आयपीएलमध्ये विस्फोटक फलंदाजी करणारा सुर्यकुमार आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्येही आपली छाप सोडताना दिसत आहे. दरम्यान, सूर्यकुमारच्या वाढदिवसानिमित्त त्यानं रचलेल्या काही खास विक्रमांवर एक नजर टाकुयात.
एका वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज
एका वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सूर्यकुमार दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या वर्षात सूर्यकुमार यादवनं 37.80 च्या सरासरीनं आणि 182 च्या स्ट्राईक रेटनं 567 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. नुकताच सूर्यानं भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या रोहित शर्माचा विक्रम मोडला होता. रोहित शर्मानं 2016 मध्ये 497 धावा केल्या होत्या.
भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
नाव | धावा | वर्ष |
शिखर धवन | 689 | 2018 |
विराट कोहली | 641 | 2016 |
रोहित शर्मा | 590 | 2018 |
सूर्यकुमार यादव | 567 | 2022 |
रोहित शर्मा | 497 | 2016 |
इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये दमदार शतक
भारतीय संघ जुलै 2022 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता.नॉटिंगहॅम येथे खेळण्यात आलेल्या तीसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडच्या संघानं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 215 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मासह सलामी देण्यासाठी मैदानात उतरलेला ऋषभ पंत स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्माही 11 धावा करून बाद झाला. तर, विराट कोहलीला या सामन्यात काही खास कामगिरी करता आला नाही. तोही 11 धावा करून माघारी परतला. मात्र, त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सूर्यकुमार यादवनं 55 चेंडूत 117 धावांची खेळी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. परंतु, या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.
एकदिवसीय सामन्याच्या पहिल्या सहा डावात 30+ धावा
वेस्ट इंडीज दौऱ्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 44 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात सूर्यकुमार यादवनं नव्या विक्रमाला गवसणी घातली होती. या सामन्यात अर्धशतकीय खेळी करत सूर्यकुमार यादवनं एकदिवसीय क्रिकेटच्या पहिल्या सहा डावात 30+ करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला होता.
हे देखील वाचा-