एक्स्प्लोर

KKR vs SRH, 1 Innings Highlights: रिंकू-नीतीश यांची फटकेबाजी, कोलकात्याची 171 धावांपर्यंत मजल

IPL 2023, KKR vs SRH: हैदराबादसमोर विजायासाठी १७२ धावांचे आव्हान आहे.

IPL 2023, KKR vs SRH: कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंह यांच्या खेळीच्या बळावर कोलकात्याने नऊ विकेटच्या मोबदल्यात १७१ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. रिंकू आणि राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरला. रिंकूने ४६ तर राणा याने ४२ धावांचे योगदान दिले. हैदराबादसमोर विजायासाठी १७२ धावांचे आव्हान आहे.


रिंकूची पुन्हा फटकेबाजी - 

रिंकू सिंह याने मोक्याच्या क्षणी वादळी फलंदाजी केली. पहिल्यांदा संयमी फलंदाजी केली. त्यानंतर अखेरीस धावा जमवल्या. रिंकू याने ४६ धावांची निर्णायाक खेळी केली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रिंकू बाद झाला. अब्दुल समद याने जबरदस्त झेल घेतला. रिंकू सिंह याने कर्णधार नीतीश राणा याच्यासमोबत ६१ धावांची महत्वाची भागिदारी केली. त्यानंतर रसेलसोबत झटपट धावा जोडल्या.

नीतीश राणा-रसेलची महत्वाची खेळी -

तीन विकेट झटपट गेल्यानंतर कर्णधार नीतीश राणा याने कोलकात्याचा डाव सावरला. रिंकूच्या मदतीने राणा याने कोलकात्याची धावसंख्या हालती ठेवली. नीतीश राणा याने रिंकूसोबत चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूत ६१ धावांची भागिदारी केली. राणा बाद झाल्यानंतर रिंकूने रसेलसोबत १८ चेंडूत ३१ धावांची भागिदारी केली. कर्णधार नीतीश राणा याने ३१ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. यामध्ये राणा याने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. तर आंद्रे रसेल याने १५ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. नीतीश राणा याला हैदराबादच्या कर्णधाराने बाद केले. तर रसेल याला मार्कंडेय याने तंबूचा रस्ता दाखवला.  अनुकूल रॉय याने अखेरीस सात चेंडूत नाबाद १३ धावांची खेळी करत इम्पॅक्ट पाडला. या खेळीत त्याने दोन चौकार लगावले.

यांचा फ्लॉप शो - 

प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याची सुरुवात निराशाजनक झाली. गुरबाज याला खातेही उघडता आले नाही. गुरबाज जानसेनच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यर यालाही जानसन याने तंबूचा रस्ता दाखवला. वेकंटेश अय्यर याने चार चेंडूत सात धावांची खेळी केली. दोन विकेटमधून कोलकात्याला सावरताच आले नाही. जेसन रॉय यानेही आपली विकेट फेकली. जेसन रॉय २० धावांवर बाद झाला. जेसन रॉय याने चार चौकाराच्या मदतीने २० धावांची खेळी केली. तीन विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू यांनी डाव सावरला. पण अखेरीस पुन्हा झटपट विकेट गेल्या. सुनील नारायण अवघ्या एका धावेवर बाद झाला. तर शार्दूल ठाकूर याला फक्त आठ धावांचे योगदान देता आले. हर्षित राणा धावबाद झाला... त्याला खातेही उघडता आले नाही. 

हैदराबादचा भेदक मारा - 

हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. पावरप्लेमध्ये कोलकात्याच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. नटराजन २० व्या षटकात फक्त तीन धावा दिल्या. हैदराबादकडून मार्को जानसेन आणि नटराजन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, एडन मार्करम आणि मयांक मार्कंडेय यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: टीम फोटो काढल्यानंतर MS धोनी स्वत: खूर्ची उचलून चालत निघाला; पुढे जे घडलं, त्यानंतर अख्खं स्टेडियम बघत बसलं, VIDEO
टीम फोटोनंतर MS धोनी स्वत: खूर्ची घेऊन निघाला; पुढे जे घडलं, अख्खं स्टेडियम बघत बसलं, VIDEO
MS Dhoni CSK vs SRH IPL 2026: तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईतील शेवटच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO
तू ना जा मेरे बादशाह...MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत; चेन्नईच्या टीम फोटोनंतर काय घडलं?, VIDEO

व्हिडीओ

Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sudhir Mungantiwar Nanded : मंत्रीपद सर्वकाही नाही; मी जनतेचा आवाज - मुनगंटीवार
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sudhir Mungantiwar Nanded : मंत्रीपद माझ्यासाठी सर्वकाही नाही, मी जनतेचा आवाज उठवणारा! | ABP Majha
Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
कोकण विधानपरिषदेसाठी महायुतीत चुरस, अनिकेत तटकरे की विकास गोगावले? उमेदवारीवर जोरदार चर्चा
Pandharpur Vitthal Temple : धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
धक्कादायक! पंढरपूर मंदिर परिसरातील महिला स्वच्छतागृहात चोरून चित्रीकरणाचा प्रयत्न, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Rahul Gandhi : देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
देशात आर्थिक संकटाचं वादळ येणार, सर्वसामान्य भरडले जाणार; पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर राहुल गांधींचा इशारा
Maharashtra Goverment Cabinet Decision: देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक; आजच्या संपूर्ण बैठकीत 1 धडाकेबाज निर्णय
Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला टाकायचे होते मेडिकल कॉलेज; NEET देणाऱ्या स्वत:च्या मुलासाठी पेपर फोडला
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
Palghar Accident: 12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
12 मृतदेह अंत्यदर्शनासाठी एका रांगेत ठेवले, बायकांचा हृदय विदीर्ण करणारा टाहो, पालघरच्या बापूगावमधील डोळे पाणावणारं दृश्य
Pandharpur News : पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की,
पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ; युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षच्या व्हीआयपी दर्शनासाठी गेटवर धक्काबुक्की
Embed widget