एक्स्प्लोर

IPL 2023 : लिलावात अनसोल्ड राहिला, कॉमेंट्री केली आता मुंबईसाठी ठरतोय 'हुकुम का एक्का'

IPL 2023 : आतापर्यंत पीयूष चावला याने दमदार कामगिरी केली आहे. पीयूष चावला यंदाच्या हंगामात मुंबईचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे.

Piyush Chawla In IPL 2023 : भारतीय लेग स्पिनर पीयूष चावला IPL 2023 च्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाच्या ताफ्यात आहे.  आतापर्यंत पीयूष चावला याने दमदार कामगिरी केली आहे. पीयूष चावला यंदाच्या हंगामात मुंबईचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज आहे. मुंबईसाठी त्याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. अनुभवी पीयुष चावला याला लिलावात कुणीही बोली लावायला तयार नव्हते. अशात मुंबईने पीयुष चावलावर विश्वास दाखवला.. मुंबईने पीयुष चावला याला 50 लाख रुपयांत आपल्या संघात घेतले. पीयूष चावला मुंबईचा यंदाच्या हंगामातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. विकेट तर घेतोय... त्याशिवाय धावाही रोखतोय. 

मुंबईसाठी चावलाचा भन्नाट शो - 
34 वर्षीय पीयूष चावला याने मुंबईकडून दमदार कामगिरी केली आहे. २०२३ मध्ये झालेल्या लिलावात मुंबईने चावलाला अवघ्या पन्नास लाख रुपयांच्या मूळ किंमतीत खरेदी केले आहे. चावलाने यंदाच्या हंगामात नऊ सामने खेळले आहेत. १७ च्या सरासरीने त्याने १५ विकेट घेतल्या आहेत. मुंबईकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात चावला प्रथम क्रमांकवर आहे. आयपीएलच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात चावला तिसऱ्या क्रमांकावर आहे.  यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात शमी पहिल्या क्रमांकावर आहे. शमीने १७ विकेट घेतल्या आहेत. 

कॉमेंट्री बॉक्समधून मैदानात पुनरागमन - 

आयपीएल 2022 मध्ये कॉमेंट्री करणारा पीयूष चावला यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी करत आहे. चावलने विकेट घेण्यासोबत धावाही रोखण्याचे काम केलेय. चावलाच्या नेतृत्वात मुंबईची फिरकी गोलंदाजी तगडी जाणवत आहे. अनुभवी चावलाकडून युवा खेळाडूंना शिकायला मिळत आहे. चावला याने यंदा प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखलेय. फक्त एका सामन्यात चावलाने ४० पेक्षा जास्त धावा खर्च केल्या आहेत. इतर सामन्यात त्याने कंजूष गोलंदाजी केली आहे. पंजाबविरोधात झालेल्या सामन्यात चावलाने चार षटकात २९ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. 

याआधीही मुंबईच्या संघाचा भाग -
याआधीही पीयूष चावला मुंबईच्या संघाचा सदस्य होता. २०२१ च्या आयपीएल हंगामात मुंबईने चावलाला २.४० कोटी रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले होते. पण त्याला फक्त एका सामन्यात संधी दिली होती. त्यावेळी चावलाने  ३८ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतली होती. त्यानंतर २०२२ मध्ये चावलाला खरेदीदार मिळाला नाही. त्यानंतर तो समालोचनासाठी गेला. पण २०२३ मध्ये चावला परतलाय. तो अधिक घातक झालाय.  

आयपीएलमध्ये चावलाची कामगिरी -
पीयूष चावला याने २००८ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत चावलाने १७४ सामने खेळले आहेत. चावलाच्या नावावर १७२ विकेटची नोंद आहे. आयपीएलमध्ये ३४८४ चेंडू टाकले असून त्याने ४५५६ धावा खर्च केल्या आहेत. १७ धावांच्या मोबदल्यात चार विकेट ही चावलाची आयपीएलमधील सर्वोच्च कामगिरी आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MVA MNS Mumbai Morcha: तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Mumbai Car Fire: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Satyacha Morcha : मविआ-मनसेच्या सत्याच्या मोर्चाचा मार्ग कसा असेल?
Raj Thackeray Satyacha Morcha : मतदार याद्यांमधील घोळविरोधातील मोर्चासाठी राज ठाकरे लोकलने प्रवास करणार
Voter List : मतदार यादीतील दुबार नावांविषयी चौकशी झाली पाहिजे
Satyacha Morcha: संविधान बचाओ, लोकशाही जगाव, महाविकास आघडीचा एल्गार!
Nashik Satyacha Morcha: सत्याच्या मोर्चासाठी नाशिकचे मनसैनिक रवाना

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MVA MNS Mumbai Morcha: तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
तब्येतीमुळे मोर्चा अन् दररोजची पत्रकार परिषदही चुकली, पण त्याच टायमिंगला ट्विट करत लक्ष वेधलं! नेमकं काय म्हणाले?
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
बेळगाव मनपाचा कानडीकरणाचा वरवंटा, कोल्हापुरातील शिवसेनेच्या नेत्यांना जिल्हाबंदी; कर्नाटक सीमेवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
Mumbai Car Fire: मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; चालक थोडक्यात बचावला, PHOTO
Raj Thackeray: एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
एकाचा पत्ता सुलभ शौचालय, राज ठाकरे म्हणाले, बसल्या बसल्या सही घेतली का?; आता निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण, म्हणाले...
Maharashtra Live Updates: राज ठाकरे लोकलने प्रवास; मोर्चासाठी चर्चगेटला रवाना
Maharashtra Live Updates: राज ठाकरे लोकलने प्रवास; मोर्चासाठी चर्चगेटला रवाना
Dharmendra Hospitalised: ‘बॉलिवूडचे ही-मॅन’ धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
‘बॉलिवूडचे ही-मॅन’ धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट
MNS MVA Mumbai Morcha: मुंबईत जय्यत तयारी झाली, पण ‘सत्याच्या मोर्चाला’ अद्यापही परवानगी मिळेना; विनापरवाना मोर्चा काढल्यास कारवाईचा इशारा
मुंबईत जय्यत तयारी झाली, पण ‘सत्याच्या मोर्चाला’ अद्यापही परवानगी मिळेना; विनापरवाना मोर्चा काढल्यास कारवाईचा इशारा
चित्रपटाच्या पटकथेचे वास्तवात रूपांतर, मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटरने शेवट; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
चित्रपटाच्या पटकथेचे वास्तवात रूपांतर, मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटरने शेवट; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा
Embed widget