IPL 2023 Final Viewership : आयपीएलची क्रेझ, 3.2 कोटी जणांनी जिओ सिनेमावर पाहिला सामना
IPL 2023 Final Viewership : हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यातील थरार 3.2 कोटी जणांनी जिओ सिनेमावर पाहिलाय.
IPL 2023 Final Viewership : अहमदाबादमध्ये सुरु असलेला गुजरात आणि चेन्नई सामना पाहण्यासाठी स्टेडिअमध्ये हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शवली होती. त्यापेक्षा जास्त जणांनी हा सामना टिव्ही आणि अॅपवर पाहिलाय. जिओ सिनामा अॅपवर कोट्यवधी जणांना आयपीएल फायनलचा थरार पाहिलाय. हार्दिक पांड्या आणि धोनी यांच्यातील थरार 3.2 कोटी जणांनी जिओ सिनेमावर पाहिलाय. हा एक प्रकारे विक्रमच झालाय.. आता
जिओ सिनेमावरील चेन्नई सुपरकिंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2023 चा अंतिम सामना 3.2 कोटी लोकांनी पाहिला, सोबतच एकाच वेळी सर्वाधिक संख्येने प्रेक्षकांचा जागतिक विक्रम मोडीत निघाला. दोन दिवसांपूर्वीच जिओ सिनेमानं आपलाच विक्रम ज्यात 2.57 कोटी प्रेक्षकांनी सामना एकत्र पाहिला होता, तो मोडीत निघाला आहे. जिओ सिनेमावर आयपीएल मोफत स्ट्रीम होण्याआधी हॉटस्टारनं आयपीएल सामना दरम्यान 1.8 कोटी प्रेक्षकांनी सामना पाहिला होता. दरम्यान, हॉटस्टारनं भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्डकप 2019च्या सेमीफायनलमध्ये एकाचवेळी 2.53 कोटी जणांनी हा सामना पाहिला होता. ह्या सामने यात जेव्हा एम.एस धोनी फलंदाजीला आला होता तेव्हा दीड कोटींवरुन 2.53 कोटींपर्यंत प्रेक्षकांची संख्या गेल्याचं बघायला मिळालं होतं. मात्र, तो आऊट झाल्यानंतर मोठी घसरण दिसली. दरम्यान, दोन्ही विक्रमावेळी धोनीची स्क्रीनवर उपस्थिती बघायला मिळाली आणि दोन्ही सामने राखीव दिवशी खेळवल्या गेले होते.
Highest peak viewership on JioCinema in IPL 2023 - 2.6 Crore.
— Johns. (@CricCrazyJohns) May 29, 2023
IPL final hype is 🔥 pic.twitter.com/N8hO28BzhB
Highest peak viewership on JioCinema:
— Johns. (@CricCrazyJohns) May 29, 2023
CSK vs GT - 3.2 crore
MI vs GT - 2.5 Crore
CSK vs GT - 2.5 Crore pic.twitter.com/iWQVeN2API
चेन्नईला 215 धावांचे आव्हान
IPL 2023 Final, GT vs CSK: साई सुदर्शन याच्या झंझावाती 96 धावांच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबद्लयात 214 धावांपर्यंत मजल मारली. साई सुदर्शनशिवाय वृद्धीमान साहा याने 54 धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून मथिशा पथीराना याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. चेन्नईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान आहे.
आणखी वाचा :
Shubman Gill : ऑरेंज कॅप शुभमन गिलकडेच, पण विराटचा विक्रम अबाधित
एकही दिल कितनी बार जितोगे, शुभमन गिलला धोनीने अवघ्या 0.1 सेकंदात धाडले माघारी