एक्स्प्लोर

DC vs KKR, Match Highlights : अटीतटीच्या लढतीत दिल्लीचा कोलकात्यावर विजय

IPL 2023, KKR vs DC : सलग पाच पराभवानंतर दिल्लीचा स्पर्धेतील पहिला विजय होय

IPL 2023, KKR vs DC:  अटतटीच्या लढतीत दिल्लीने कोलकात्याचा चार विकेटने विजय मिळवला. 127 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची तारांबळ उडाली होती. डेविड वॉर्नरचे अर्घशतक वगळता दिल्लीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अक्षर पटेल याने अखेरच्या षटकात निर्णायक फलंदाजी केल्यामुळे दिल्लीचा विजय झाला. दिल्लीने चार विकेट आणि चार चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. यंदाच्या हंगामातील दिल्लीचा हा पहिला विजय होय. लागोपाठ पाच पराभवानंतर दिल्लीने पहिला विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेय. 

कोलकात्याने दिलेले 128 धावांचे आव्हान पार करताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज पृथ्वी शॉ पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. पृथ्वी शॉ याला १३ धावांवर वरुण चक्रवर्तीने तंबूत धाडले. त्यानंतर मिचेल मार्श आणि सॉल्टही एकापाठोपाठ एक तंबूत परतले. मिचेल मार्श दोन तर सॉल्ट पाच धावा काढून बाद झाले. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला डेविड वॉर्नर संयमी फलंदाजी करत होता. पण वरुण चक्रवर्ती याने डेविड वॉर्नर याला तंबूत पाठवले. वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. वॉर्नरने ४१ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ११ चौकार लगावले. वॉर्नर बाद झाल्यानंतर मनिष फांडे आणि अक्षर पटेल यांनी डाव सांभाळला. मनिष पांडे २१ धावांवर बाद झाला. त्यानंतरअमन खान गोल्डन डकचा शिकार झाला. त्यानंतर अक्षर पटेल याने ललीत यादव याला जोडीला घेत दिल्लीला विजय मिळवून दिला. धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी एकही षटकार लगावला नाही. 

कोलकात्याकडून वरुण चक्रवर्ती, अनुकूलरॉय आणि नितेश राणा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. १२८ धावांचा बचाव कराताना कोलकात्याच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मरा केला. कोलकात्याच्या गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती. डेविड वॉर्नर, मनिष पांडे आणि अक्षर पटेल यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर दिल्लीने बाजी मारली. 

दरम्यान, दिल्लीच्या भेदक माऱ्यासमोर प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याच्या फलंदाजांची दाणादाण उडाली. अक्षर पटेल, कुलदीप यादव, ईशांत शर्मा आणि अनरिख नॉर्खिया यांच्या भेदक गोलंदाजीसमोर कोलकात्याच्या फलंदाजांनी नांगी टाकली. कोलकात्याचा संघ 20 षटकात 127 धावांपर्यंत मजल मारु शकला.  नाणेफेक जिंकून डेविड वॉर्नर यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीच्या गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात तीन षटकार लगावल्यामुळे कोलकाता 127 धावांपर्यंत मजल मारु शकला. 

जेसन रॉयची एकाकी झुंज - 

एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला सलामी फलंदाज जेसन रॉय याने संयमी फलंदाजी केली. जेसन रॉय याने 39 चेंडूत 43 धावांचे योगदान दिले. यामध्ये जेसन रॉय याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला.  जेसन रॉय याने कोलकात्याकडून आज पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच जेसन याने एकाकी झुंज दिली. कुलदीप यादव याने जेसन रॉय याला बाद करत दिल्लीला मोठे यश मिळवून दिले. 

कोलकात्याची फलंदाजी ढेपाळली - 

दिल्लीच्या भेदक माऱ्यापुढे कोलकात्याची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. लिटन दास अवघ्या चार धावा काढून तंबूत परतला. त्यानंतर मुंबईत शतक झळकावणारा वेंकटेश अय्यर गोल्डन डकचा शिकार झाला. कर्णधार नीतीश राणा चार धावा काढून ईशांत शार्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. मनदीप सिंह याचा अडथळा अक्षर पटेलने दूर केला. विस्फोटक रिंकूलाही अक्षर पटेल याने तंबूचा रस्ता दाखवला. सुनी नारायण चार धावा काढून बाद झाला.. अनुकूल रॉय याला भोपळाही फोडता आला नाही. उमेश यादव याला एनरिक नॉर्किया याने झेलबाद केले.  कोलकात्याच्या फलंदाजांना भागिदारी करण्यात अपयश आले. ठरावीक अंतरावर कोलकात्याने विकेट फेकल्या.अखेरच्या षटकात आंद्रे रसेल याने दमदार फलंदाजी केल्यामुळे कोलकाता सन्मानजक धावसंख्यापर्यंत पोहचला. आंद्रे रसेल याने अखेरच्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकत कोलकात्याची धावसंख्या वाढवली. आंद्रे रसेल याने 31 चेंडूत 38 धावांची खेळी केली. या खेळीत रसेलने चार षटकार लगावले. 

दिल्लीचा भेदक मारा, कोलकात्याच्या फलंदाजी फेकल्या विकेट -

कोलकात्याच्या दिग्गज फलंदाजांनी ठरावीक अंतरावर विकेट फेकल्या.  कोलकात्याच्या फंलदाजांना भागिदारी करता आली नाही. कोलकात्याकडून एकही अर्धशतकी भागिदारी झाली नाही. सर्वात मोठी भागिदारी दहाव्या विकेटसाठी झाली. आंद्रे रसेल याने वरुण चक्रवर्तीसोबत कोलकात्याची धावसंख्या वाढवली. दिल्लीकडून ईशांत शर्मा, एनरिख नॉर्किया, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. मुकेश कुमार याला एक विकेट मिळाली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Pankaja Munde: वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: 'मृतांचा आकडा वाढण्याची भीती', राजधानी हादरली; Mumbai मध्ये हाय अलर्ट
Delhi Blast Alert: 'खिडकी हिल गई', लाल किल्ला स्फोटानंतर Delhi हादरली, राजधानीत High Alert
Delhi Blast: 'संपूर्ण Delhi हाय अलर्टवर', Lal Qila स्फोटानंतर दहशतीचे वातावरण
Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ कारमध्ये शक्तिशाली स्फोट, दिल्लीत हाय अलर्ट जारी, घातपाताचा संशय
Delhi Blast: 'प्रथम दर्शनी हा बॉम्बस्फोटच वाटतो', लेफ्टनंट कर्नल सतीश ढगेंचा मोठा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Pankaja Munde: वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
वैद्यनाथ कारखाना देताना मला प्रचंड वेदना झाल्या; गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत पंकजा मुंडे गहिवरल्या
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?
सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोन्याचे दर वाढणार की घसरणार, सोनं खरेदी करावं की थांबावं?
Ajinkya Naik : मुख्यमंत्री, शरद पवार आणि आशिष शेलारांना मी योग्य खेळाडू वाटलो; MCA अध्यक्षपदावर बिनविरोध निवड, अजिंक्य नाईक यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री, शरद पवार आणि आशिष शेलारांना मी योग्य खेळाडू वाटलो; MCA अध्यक्षपदावर बिनविरोध निवड, अजिंक्य नाईक यांची प्रतिक्रिया
शरद पवारांची 'ती' गुगली अन् अजिंक्य नाईक बनले एमसीए निवडणुकीच्या मैदानात चॅम्पियन, इनसाईड स्टोरी
शरद पवारांची 'ती' गुगली अन् अजिंक्य नाईक बनले एमसीए निवडणुकीच्या मैदानात चॅम्पियन, इनसाईड स्टोरी
लोकसभेला बिनसलं, पण स्थानिकला जमलं! सतेज पाटील अन् राजू शेट्टींची गट्टी; कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी अन् महाविकास आघाडी एकत्र लढणार
लोकसभेला बिनसलं, पण स्थानिकला जमलं! सतेज पाटील अन् राजू शेट्टींची गट्टी; कोल्हापूर जिल्ह्यात स्वाभिमानी अन् महाविकास आघाडी एकत्र लढणार
Embed widget