(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DC vs MI : डेविड वॉर्नरच्या कासवछाप खेळीवर इरफान पठण भडकला! म्हणाला....
डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. पण वॉर्नरच्या संथ फलंदाजीबद्दल अनेकांनी टीका केली आहे.
Mumbai Indians vs Delhi Capitals, Irfan Pathan : मंगळवारी मुंबईने अखेरच्या चेंडूवर दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. या सामन्यात दिल्लीने 172 धावांपर्यंत मजल मारली होती. डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. पण वॉर्नरच्या संथ फलंदाजीबद्दल अनेकांनी टीका केली आहे. भारताचा माज क्रिकेटपटू इरफान पठाण यानेही वॉर्नरच्या संथ खेळीवर नाराजी व्यक्त केली. इरफान पठणा याने वॉर्नरच्या संथ खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. त्याशिवाय स्ट्राइक रेटही खराब असल्याचे म्हटले... इरफान पठाण याने ट्वीट करत आपले मत व्यक्त केले. त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये ट्वीटरवॉरला सुरुवात झाली. काही इरफानच्या बाजूने होते, तर काहींनी इरफानवर टीका केली.
भारताची माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने डेविड वॉर्नरच्या फलंदाजीवर ट्वीट केले. वॉर्नरने मुंबईविरोधात ४७ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. यावर इरफान पठाण चांगलाच भडकलेला दिसला. पठाण याने वॉर्नरच्या संथ फलंदाजीबाबत ट्वीट करत म्हटले की, ‘ डेविड वॉर्नर खूप दिवसांपासून कमी स्ट्राईक रेटने धावा काढत आहे. त्याच्या स्ट्राईक रेटकडे कुणाचे लक्ष कसे गेले नाही. ’. इरफान पठाण याच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले. एक वॉर्नरच्या सपोर्टमध्ये होता तर दुसरा वॉर्नरच्या फलंजाजीवर टीका करणारा... तर काही युजर्सनी इरफान पठाण याच्या वक्तव्याचे समर्थन केले. तर काहींच्या मते, वॉर्नर एका बाजूने आपले काम करत होता... दुसऱ्या बाजूला कुणी धावाच काढत नाही.. तर त्यात वॉर्नरची काय चूक... अशा वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
How come no one pointing out strike rate of David Warner?? He is been playing with low strike for quite sometime now…
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 11, 2023
How come no one spoke about a great catch by Samson in the RR DC match, one which was much better than some average+ ones which were celebrated. What i am saying is: that is how all these experts or specialists are. "inconsistent"
— Ramkrishna Iyer (@KannanK51531500) April 11, 2023
Irfan bhai, everyone has been pointing it out on Star English comms. Heard Simon Doull, & Harsha sir speak about it every game.
— Vishesh Roy (@vroy38) April 11, 2023
We need couple of top orders players to play anchor innings. It's okay if SR is not too high. @davidwarner31
— Jatin Malhotra (@jatin1malhotra) April 11, 2023
True! Different standards for Kohli and different for Warner.
— Farid Khan (@_FaridKhan) April 11, 2023
Exactly
— . (@AamirsABD) April 11, 2023
Start achaa kiya Warner dusri side se koi maar hi nhi rha
लेकिन भाई वॉर्नर के साथ ये भी हो रहा है कि दूसरी साइड से लगातार विकेट गिर जाते हैं और फिर उनपर प्रेशर आ जाता है. ये भी एक प्वाइंट है. आप देखें न पृथ्वी शॉ चलें न रीली रौसो ना मनीष पांडे.
— Mohammad Wahid 🇮🇳 (@wahidlucknavi) April 11, 2023
वॉर्नरची ५१ धावांची खेळी -
एका बाजूला विकेट पडत असताना डेविड वॉर्नर याने संयमी फलंदाजी करत दिल्लीच्या डावाला आकार दिला. डेविड वॉर्नर याने 47 चेंडूत संयमी 51 धावांची खेळी केली. या खेळीत वॉर्नर याने सहा चौकार लगावले. वॉर्नर याने संथ फलंदाजी केली. त्याच्या बॅटवर चेंडू येत नव्हता.. त्यात दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या. पण डेविड वॉर्नर याने संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केलेय. डेविड वॉर्नर याने सलामीला पृथ्वी शॉ याच्यासोबत 33 धावांची भागिदारी केली. त्यानंतर मनिष पांडे याच्यासोबत 43 धावा जोडल्या. तर अक्षर पटेल याच्यासोबत 67 धावांची भागिदारी केली.