IPL 2023, CSK vs PBKS: कॉनवेच्या वादळी 92 धावा, चेन्नईची 200 धावांपर्यंत मजल
CSK vs PBKS, 1 Innings Highlights: पंजाबला विजयासाठी 201 धावांचे आव्हान आहे.
CSK vs PBKS, 1 Innings Highlights: डेवेन कॉनवच्या दमदार खेलीच्या जोरावर चेन्नईने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबद्लयात 200 धावांपर्यंत मजल मारली. कॉनवे याने नाबाद 2 धावांची खेळी केली. कॉनवेचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या ओलांडता आली नाही. पंजाबला विजयासाठी 201 धावांचे आव्हान आहे.
कॉनवेचे दमदार खेळी -
एकीकडे विकेट पडत असताना डेवेन कॉनवे याने आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या चेंडूपासूनच कॉनवेने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. कॉनवेच्या फलंदाजीपुढे पंजाबची गोलंदाजी दुबळी जाणवत होती. डेवेन कॉनवेने 52 चेंडूत नाबाद 92 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने एक षटकार आणि 16 चौकार लगावले.
चेन्नईची फलंदाजी कशी झाली ?
चेन्नईचा कर्णधार एम एस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांनी चेन्नईला दमदार सुरुवात दिली. दोघांनी 86 धावांची भागिदारी केली. ऋतुराज गायकवाड याने संयमी फलंदाजी केली तर कॉनवे याने फटकेबाजी केली. दोघांनी सुरुवातीपासूनच पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. ऋतुराज गायकवाड याने 37 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि चार चौकारांचा पाऊस पाडला. ऋतुराज बाद झाल्यानंतर कॉनवेने शिवम दुबेला सोबत घेत चेन्नईच्या डावाला आकार दिला. शिवम दुबे याने 17 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. कॉनवेने दुबेसोबत 26 चेंडूत 44 धावांची भागिदारी केली.
दुबे बाद झाल्यानंतर कॉनेवेने मोईन अलीसोबत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण मोईन अली याला मोठी खेळी करता आली नाही. मोईन अली सात चेंडूत 17 धावा काढून बाद झाला. मोईन अली बाद झाल्यानंतर रविंद्र जाडेजासोबत कॉनवेने फिनिशिंग टच दिला. अखेरच्या षटकात जाडेजाला सॅम करन याने तंबूत पाठवले. जाडेजाने 10 चेंडूत 12 धावांचे योगदान दिले. धोनीने अखेरच्या दोन चेंडूवर दोन षटकार लगावत चेन्नईची धावसंख्या 200 पर्यंत पोहचवली. धोनीने चार चेंडूत 13 धावांचे योगदान दिले.
MS Dhoni's two sixes on the final two balls - The GOAT! pic.twitter.com/pPoelM13X7
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 30, 2023
पंजाबची गोलंदाजी कशी -
पंजाबच्या गोलंदाजांना अचूक टप्प्यावर मारा करता आला नाही. प्रत्येक गोलंदाजांनी धावा खर्च केल्या. अर्शदीप सिंह, सॅम करन, राहुल चहर आणि सिकंदर रजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. तर कगिसो रबाडा आणि लियाम लिव्हिंगस्टोनची पाटी कोरीच राहिली.