IPL 2022: वीरेंद्र सेहवागनं सांगितला चेन्नईचा 'फ्यूचर कॅप्टन', रवींद्र जाडेजा नव्हे तर 'या' खेळाडूचं घेतलं नाव!
रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. त्यानंतर आयपीएलच्या मध्यांत रवींद्र जाडेजानं पुन्हा चेन्नईच्या संघाची जबाबदारी महेंद्रसिंह धोनीकडं सोपवली.
![IPL 2022: वीरेंद्र सेहवागनं सांगितला चेन्नईचा 'फ्यूचर कॅप्टन', रवींद्र जाडेजा नव्हे तर 'या' खेळाडूचं घेतलं नाव! IPL 2022: Virendra Sehwag Names The Future Captain Of Chennai Super Kings IPL 2022: वीरेंद्र सेहवागनं सांगितला चेन्नईचा 'फ्यूचर कॅप्टन', रवींद्र जाडेजा नव्हे तर 'या' खेळाडूचं घेतलं नाव!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/14/c6a78857a73c26b4381fd5c973ee518a_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Future Captain Of Chennai Super Kings: आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाकडं संघाचं नेतृत्व सोपवलं होतं. दरम्यान, रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघानं निराशाजनक कामगिरी करून दाखवली आहे. त्यानंतर आयपीएलच्या मध्यांत रवींद्र जाडेजानं पुन्हा चेन्नईच्या संघाची जबाबदारी महेंद्रसिंह धोनीकडं सोपवली. चेन्नईला 4 वेळा विजेतेपद जिंकून देणारा चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी निवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहे, असं बोललं जातंय. अशा परिस्थितीत चेन्नईचा संघ एका युवा खेळाडूच्या शोधात आहे, जो दीर्घकाळ संघाचं नेतृत्व करू शकेल. चेन्नई सुपर किंग्जच्या या प्रश्नाचे उत्तर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनं दिलं आहे.
सेहवाग काय म्हणाला?
सेहवागनं ऋतुराज गायकवाडचं चेन्नई सुपर किंग्जचा भावी कर्णधार म्हणून नाव घेतलं आहे. गायकवाड हा शांत स्वभावाचा असून त्यांनी महाराष्ट्राचे कर्णधारपदही भूषवल्यामुळं त्यांना खेळ कसा चालवायचा हे माहीत असल्याचे त्यांनी सांगितले. कबझशी बोलताना माजी वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, " ऋतुराज गायकवाड महाराष्ट्राचा कर्णधार आहे. तो अतिशय शांतपणे खेळतो. त्यानं शतक ठोकले तरी तो शांत राहतो आणि शून्यावर बाद झाल्यानंतरही त्याची प्रतिक्रिया तशीच राहते. हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसून येत नाही. शतक झळकावताना आनंद होतो किंवा शून्यावर आऊट झाल्यानं दु:खी होतो. त्याच्याकडं नियंत्रण आहे, तो शांत आहे. त्याच्याकडं एक चांगला कर्णधार होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत. तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आहे. सामना कसा चालवायचा. कोणाकडून गोलंदाजी करून घ्यायची? फलंदाजीच्या क्रमवारीत कोणते बदल करायचे आहेत, त्याला सर्व काही माहीत आहे."
ऋतुराजकडं एमएस धोनीचे सर्व गुण
सेहवाग पुढे म्हणाला की, "ऋतुराज गायकवाडनं आणखी तीन-चार हंगाम खेळले तर, तो एक कर्णधार बनेल जो एमएस धोनीनंतर दीर्घकाळ संघाचे नेतृत्व करू शकेल. संपूर्ण जग धोनीला का मानतं? कारण तो चांगला कर्णधारासह शांत डोक्यानं खेळ पुढे चालवतो. सामन्यात त्याच्या गोलंदाजांचा आणि फलंदाजांचा चांगला वापर करून घेतो. ऋतुराजकडं एमएस धोनीचे सर्व गुण आहेत", असंही सेहवागनं म्हटलं आहे.
ऋतुराज गायकवाडची कामगिरी
आयपीएलच्या मागच्या हंगमात चेन्नईच्या संघाला विजेतेपद जिंकून देण्यासाठी ऋतुराज गायकवाड महत्वाची भूमिका बजवली होती. या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्यानं या हंगामात 635 धावा केल्या होत्या. यंदाच्या हंगामात ऋतुराज गायकवाडला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यानं या हंगामात 313 धावा केल्या आहेत. तसेच चेन्नईसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)